Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये केली सील

शिंदे-ठाकरे गटातील राड्यानंतर आयुक्तांनी घेतला निर्णय

मुंबई ः  शिंदे-ठाकरे गटात बुधवारी (दि.28) झालेल्या राड्यानंतर मुंबईतील सर्वच पक्षांची कार्यालये गुरूवारी सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयु

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
प्रदीप भिडे यांचा अल्पपरिचय
रायगडावर होणार ‘तुतारी’ चिन्हाचे अनावरण

मुंबई ः  शिंदे-ठाकरे गटात बुधवारी (दि.28) झालेल्या राड्यानंतर मुंबईतील सर्वच पक्षांची कार्यालये गुरूवारी सील करण्यात आली आहे. मुंबई महापालिका आयुक्त आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या आदेशानुसार सील करण्यात आलेली कार्यालये पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील. बुधवारी शिंदे गटाने मुंबई महापालिकेत जात शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर ठाकरे गटही याठिकाणी पोहोचला. आणि दोन्ही पदाधिकार्‍यांमध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले.

राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे आणि ठाकरे गट वारंवार आपापसात भिडताना पाहायला मिळत आहे. आता ही लढाई थेट मुंबई महापालिकेत रंगलेली पाहायला मिळत आहे. मागील पंचवीस वर्ष मुंबई महानगर पालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. आता शिंदे गट शिवसेनेपासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्याकडून या कार्यालयावर दावा सांगण्यात येत आहे. बुधवारी(दि.28) शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, नरेश म्हस्के, यशवंत जाधव, गिरीश धानुरकर यांच्यासह काही पदाधिकारी व कार्यकर्ते कार्यालय ताब्यात घेण्यासाठी याठिकाणी पोहोचले. त्यानंतर दोन्ही गटात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिंदे-ठाकरे गट एकमेकांविरोधात आक्रमक झाले होते. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी पन्नास खोके, एकदम ओक्के अशी नारेबाजी केली तर त्याला शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी प्रत्युत्तर दिले. हा वाद वाढत असतानाच बीएमसीच्या सुरक्षारक्षकांना सोबत घेऊन मुंबई पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेच्या इमारतीबाहेर काढले. नागपूर विधिमंडळ अधिवेशनासाठी विधानभवनातील पक्ष कार्यालयावरुन ठाकरे आणि शिंदे गटात रणकंदन झाले होते. नागपुरातील कार्यालयात ठाकरे गटाने आधीच शड्डू ठोकले होते. पण सीएम एकनाथ शिंदे यांनी नागपुरात पोहचताच ते कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतले होते. त्यानंतर दोन्ही गटातील वादाच्या ठिणग्याही सर्वश्रुत आहेत.

COMMENTS