मुंबई/प्रतिनिधी ः तब्बल 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मधील 100 रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने क

मुंबई/प्रतिनिधी ः तब्बल 16 वर्षांपूर्वी म्हणजे 2007 मधील 100 रुपयांच्या लाचेच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेला निकाल मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे या प्रकरणातील आरोपी सरकारी वैद्यकीय अधिकार्याची सुटका झाली आहे.
न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकल पीठाने मंगळवारी हा निवाडा करतांना लाचेचे किरकोळ प्रकरण असल्याचे निरीक्षण नोंदवले. 2007 मध्ये 100 रुपयांचे मूल्य कमी होते. 2023 मध्ये त्याचे मूल्य आणखी कमी झालेले आहे. त्यामुळे हा खटला किरकोळ स्वरूपात चपखल बसतो, असे कोर्टाने म्हटले आहे. घटना पुणे जिल्ह्यातील पौड येथील आहे. एल. टी. पिंगळे यांना पुतण्याने मारहाण केली होती. त्यात ते जखमी झाल्यानंतर पौड ग्रामीण रुग्णालयात जखम प्रमाणित करण्यासाठी डॉ. अनिल शिंदेंकडे गेले. डॉ. शिंदेंनी त्यांना प्रमाणपत्राच्या बदल्यात 100 रुपयांची लाच मागितली. याची पिंगळेंनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचून डॉ. शिंदे यांना रंगेहाथ अटक केली. मात्र, जानेवारी 2012 मध्ये विशेष न्यायालयाने डॉ. शिंदे यांची सुटका केली.
COMMENTS