Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र देणार्‍यांवर गुन्हा

पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी प

काँगे्रसचे आमदार झिशान सिद्दीकींचे बंड
शहरातील एलआयसीच्या 68 इमारती धोकादायक!
भीमजयंती दिनी डॉ.फुगारे यांच्या उपस्थितीत  पाणीवाटपाचे आयोजन

पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलातील पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सुजित शिवाजी साळुंखे (वय 25, रा. अकोले खुर्द, ता. माढा, जि. सोलापूर), शरद नागनाथ माने (वय 26, रा. वडोली, ता.माढा, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुजीत साळुंखे, शरद माने पुणे ग्रामीण पोलिस दलातील भरती प्रक्रियेत सहभागी झाले होते. पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत दोघांनी प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र पोलिस अधीक्षक कार्यालयात सादर केले होते. प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बीडमधील जिल्हा पुर्नवसन अधिकारी कार्यालयातून घेतल्याचे दोघांनी भासविले होते. भरती प्रक्रियेत आरोपी साळुंके, माने यांनी बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे तपासणीत उघडकीस आले. या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS