माजी महिला नगराध्यक्षा ताडे यांची  घरात गळफास घेऊन आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी महिला नगराध्यक्षा ताडे यांची घरात गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर/प्रतिनिधी- श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे  ( वय  ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्ये

श्रीगोंदा नगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढणार
शेवगाव येथील घटनेच्या निषेधार्थ पाथर्डी बंद
आठ वर्षीय तनिषला दुचाकीची धडक

अहमदनगर/प्रतिनिधी- श्रीगोंदा शहराचे नगराध्यक्ष पद भूषविलेल्या श्यामला मनोज ताडे  ( वय  ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्ये छताच्या फॅनला गळ्याभोवती साडी गुंडाळून गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. दिनांक २० डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.ही घटना धनश्री अपार्टमेंट श्रीगोंदा येथे त्यांच्या राहत्या घरात घडली आहे किरण दगडू ताडे (वय ४३) यांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनला या घटनेबाबत माहिती दिली आहे. या माहिती वरून पोलिसांनी सीआरपीसी 174 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली.पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळी भेट दिली असून, पुढील तपास पोलिसकर्मचारी खारतोडे करीतआहे.मिळालेल्या माहितीनुसार श्यामला ताडे या श्रीगोंदा नगरपालिकेमध्ये अडीच वर्ष नगराध्यक्ष पदावर कार्यरत होत्या. अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षित जागेवर त्या निवडून आल्या होत्या.Attachments area

COMMENTS