Homeताज्या बातम्यामनोरंजन

सिंघम 3’मधील बाजीराव सिंघमचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट

मुंबई प्रतिनिधी - अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातून बाजीराव सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अज

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अखेर जामीन मंजूर.
या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाली चोरी | LOKNews24
कोरोनाचा उद्रेक ! पारनेरमध्ये 52 विद्यार्थी बाधित

मुंबई प्रतिनिधी – अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटातून बाजीराव सिंघम म्हणजेच चाहत्यांचा लाडका अजय देवगनचा चित्रपटातील पहिला लूक समोर लूक समोर आला आहे. चाहते ‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगनचा लूकची वाट पाहत होते. अखेर प्रतीक्षा संपली असून रोहित शेट्टीने अंगावर शहारे आणणारा अजयचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. अजय देवगणचा लूक शेअर करताना रोहित शेट्टीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तो पराक्रमी आहे, त्याच्याकडे शक्ती आहे, तो खतरा आहे, तो ताकद आहे..सिंघम पुन्हा येतोय”. सगळ्यांचा आवडता पोलिस. बाजीराव सिंघम परत आला आहे.

सिंघम अगेनमधील अजय देवगणचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांची आणखीनच उत्सुकता वाढवली आहे. रोहित शेट्टीच्या शेअर केलेल्या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहे. एका यूजरने लिहिले की, सुपर सर….फायर इमोजी देखील पोस्ट केले. तर दुसर्‍याने यूजरने लिहिले आहे की,आता प्रतीक्षा करू शकत नाही. सिंघम अगेनचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. सिंघम फ्रँचायझीचा हा तिसरा चित्रपट आहे. अजय देवगण बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसणार आहे. अजय देवगनाच्या भूमिकेला चाहत्यांनी कायम पसंती दर्शवली आहे.

COMMENTS