जालना ः मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी आंदोलकांनी आपला लढा तीव्र केला आहे. राज्य सरकार सगे-सोयर्याची अंमलबजावण
जालना ः मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी आंदोलकांनी आपला लढा तीव्र केला आहे. राज्य सरकार सगे-सोयर्याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे, असे झाल्यास ओबीसी आरक्षणावर गदा येवू शकते, याविरोधात ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला गुरूवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाचे ताट वेगळेच हवे, असे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी हाके आणि त्यांच्या सहकार्यांना किमान पाणी पिण्याचा आग्रह केला आहे. त्यांच्या विनंतीनंतर दोघांनीही पाणी घेतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना अॅड. आंबेडकर म्हणाले की, पाणी प्यायला हरकत नाही. त्यांनी पाणी पिले पाहिजे. राज्य सरकारने या प्रकरणी गांभीर्याने घेत नाही. भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय, याची भीती आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाचे नेत्यांना आपण भूमिका घ्यायला सांगितले पाहिजे. यामधून मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळे असले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. तसेच पुढे ते म्हणाले, ’’मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. भाजप संविधान बदलेल, या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावर ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते. मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना सगेसोयरे शब्द जे ते म्हणत होते, त्याबद्दल मी सल्ला दिला होता. सगेसोयरे शब्दाची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
उपोषणाचा आज नववा दिवस – प्रा. लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी आमरण उपोषणाला बसले असून, आज शुक्रवारी त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. डॉक्टरांनी हदयविकार किंवा पक्षघाताचा धोका देखील वर्तवला आहे. तरीदेखील राज्य सरकार जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे हाके यांनी म्हटले आहे. राज्य सरकारचे शिष्ठमंडळही हाके यांच्या भेटीला गेले होते. यावेळी हाके यांनी चर्चा करण्यासाठी स्वतःचे शिष्ठमंडळ पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांचे उपोषण सुरूच आहे.
COMMENTS