Homeताज्या बातम्यादेश

आता वर्षातून 4 वेळा करता येणार मतदान नोंदणी

2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांत सुरु होणार नोंदणी

 मतदान करण्यासाठी आवश्यक असणारे दस्तऐवज म्हणजे मतदान कार्ड. वयाची 18 वर्ष पूर्ण झाले की मतदान कार्ड काढता येते. मात्र, हे कार्ड काढण्यासाठी यापूर

पिंपरी-चिंचवडमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर अत्याचार | LOKNews24
उन्हाचा पारा वाढु लागल्याने गुजरातच्या मातीचे माठ विक्रीसाठी दाखल  
Akole : राजूर येथे आगळे वेगळे गणेश विसर्जन

 मतदान करण्यासाठी आवश्यक असणारे दस्तऐवज म्हणजे मतदान कार्ड. वयाची 18 वर्ष पूर्ण झाले की मतदान कार्ड काढता येते. मात्र, हे कार्ड काढण्यासाठी यापूर्वी 1 जानेवारीची वाट पाहायला लागत होती. परंतु, आता वर्षातून चारवेळा मतदान नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. विमुक्त व भटक्या जमातीतील व्यक्तींसाठी देखील विशेष शिबिर आयोजित केले जाणार आहे.  याचा फायदा वर्धा जिल्ह्यातील नवमतदारांना होणार आहे. आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी 1 जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. 1 जानेवारी किंवा त्याआधी 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांनाच मतदार नोंदणी करता येत होती. परंतु, 2023 पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर महिन्यांच्या एक तारखेला किंवा त्याआधी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना नोंदणी करता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2023 राबविला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान नवमतदारांना नाव नोंदणी करता येणार आहे. याशिवाय विद्यार्थी, दिव्यांग व महिला आदींना मतदार नोंदणी करता यावी म्हणून परिसरातील मतदान केंद्रांवर विशेष शिबिर राबविले जाणार आहे. 9 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत अर्ज क्रमांक 6 भरून आगाऊ मतदान नोंदणी करता येणार आहे. जेव्हा 18 वर्षे पूर्ण होईल तेव्हा मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केले जाईल.

COMMENTS