राहुरी ः राहुरी नगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या ताफ्यात नवी कोरी फायर बुलेट दाखल झाली असून आग , जळीत अशा संकट , घटनेच्या वेळी संकट ती आता धावून

राहुरी ः राहुरी नगरपालिकेच्या आपत्कालीन कक्षाच्या ताफ्यात नवी कोरी फायर बुलेट दाखल झाली असून आग , जळीत अशा संकट , घटनेच्या वेळी संकट ती आता धावून जाणार आहे. राहुरी शहरासह तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी जळीत व आगीच्या घटना घडतात. यावेळी राहुरी नगरपालिकेची अग्निशामक दलाचे चार चाकी वाहन उपलब्ध होते. अनेक वेळेला एखाद्या दुर्गम ठिकाणी, अरुंद बोळ, गल्ली किंवा ठिकाण असल्यावर जळीत घटना घडलेल्या ठिकाणी आपत्कालीन कक्षाच्या जवानांना अग्निशामक वाहन घेऊन जाण्यास अडथळे येतात. जिल्हा नियोजन समितीच्या माजी सदस्या, माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपालिकेत यापूर्वी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपत्कालीन कक्ष विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांशी संवाद साधत याविषयी चर्चा केली होती. शासनाकडे तात्काळ उपलब्ध होणारे वाहनाची मागणी केली होती. महाराष्ट्र शासनाच्या अग्निशामक संचालनालयाच्याकडून राहुरी नगरपालिकेला नुकतीच रॅपिड फायर बुलेट नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे. या दुचाकी फायर बुलेट मध्ये सायरन व्यवस्था तर आहेच शिवाय दोन्ही बाजूने वीस लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या आहेत. पन्नास फूट पर्यंत जाईल असा फायर पंप पाईप देखील आहे. याशिवाय जळीत व लागलेली आग विझविण्यासाठी केमिकल देखील उपलब्ध असून कटावणी, वायर तोडण्याचे साहित्य, आदी आपत्कालीन काळातील साहित्य उपलब्ध आहे. राहुरी शहर व परिसर मध्ये अनेक ठिकाणी अरुंद गल्लीबोळ, रस्ते असल्याने शासनाने फायर बुलेट उपलब्ध करून दिल्याने याची मदत जळीत किंवा अकस्मात आग लागलेल्या ठिकाणी होईल. जळीत झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेशी संपर्क केल्यास तात्काळ फायर बुलेट उपलब्ध केली जाईल, अशी माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे.
COMMENTS