Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आता नाशिकमध्येही लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कोपी हॅण्डस ऑन ट्रेनिंग सेंटर

डॉ. एच. वाय. बांगर यांच्या अडव्हान्स हिस्ट्रोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपिक सेंटरला हॅण्डस ऑन ट्रेनिंग सेंटरचाही दर्जा

नाशिक – मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होणाऱ्या नाशिककडे आता देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष वेधले जात आहे. महाराष्ट्रातील पहिले ऑपरेटीव्ह

राज्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज
कर्जतमध्ये कवयित्री स्वाती पाटील यांनी केला पत्रकारांचा सत्कार
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार : पटोले

नाशिक – मेडिकल टुरिझम म्हणून विकसित होणाऱ्या नाशिककडे आता देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष वेधले जात आहे. महाराष्ट्रातील पहिले ऑपरेटीव्ह हिस्ट्रोस्कोपी हॅण्डस ऑन ट्रेनिंग आणि उत्तर महाराष्ट्रातील पहिले लॅप्रोस्कोपी हॅण्ड ऑन ट्रेनिंग देणारे  सेंटर म्हणून नाशिकमधील अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सेंटरने लौकीक मिळविला आहे. या सेंटरद्वारे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिली जात असून यामूळे नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

एमबीबीएस, एमडी, एमएस यांसारखे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना हॅण्डस ऑन ट्रेनिंग आवश्यता असते. वैद्यकीय अ्भ्यासक्रम पुर्ण करीत असताना ज्या अॅडव्हान्स गोष्टींचे ज्ञान वैद्यकीय महाविद्यालयांत मिळत नाही ते प्राप्त करण्यासाठी फेलोशिप गरजेची ठरते. जर्मनी येथून डॉ. एच. वाय बांगर यांनी लॅप्रोस्कोपीमधील आपले अॅडव्हान्स शिक्षण पुर्ण केले आहे. नाशिकमधील नामांकीत लॅप्रोस्कोपी सर्जन म्हणून ते अग्रणी असून त्यांनी आतापर्यंत दुर्बिणीद्वारे १० हजारांहून अधिक पोटाच्या आतील शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी) तसेच गर्भपिशवीच्या आतील शस्त्रक्रिया (हिस्ट्रोस्कोपी) केल्या आहेत. तब्बल १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, अत्याधुनिक यंत्रसामग्री, नवीन तत्रंज्ञान,आधुनिक उपकरणांची उपलब्धता हे बांगर यांच्या राणेनगर येथील अॅडव्हान्स लॅप्रोस्कोपी सेंटरचे बलस्थान आहे. त्यामुळेच त्यांच्याकडून हॅण्डस ऑन ट्रेनिंग मिळावी याकरीता एमबीबीएस, एमडी, एमएससारखे पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षण पुर्ण करणारे विद्यार्थी संपर्क साधत आहेत. विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बांगर यांनी हॅण्डस ऑन ट्रेनिंग सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. एमडी, एमएस पूर्ण केलेले तीन विद्यार्थी सध्या डॉ. बांगर यांच्याकडे हॅण्डस ऑन ट्रेनिंग घेत आहेत. त्यापैकी दुबई येथून आलेल्या एका विद्यार्थिनीने हॅण्डस ऑन ट्रेनिंग पूर्ण केली असून सध्या लखनऊ येथील विद्यार्थिनी डॉ. पूजा मिश्रा, दिल्ली येथील डॉ. विजेता कुमारी तर दुबई येथील हेमगौरी आंचलंम हॅण्डस ऑन ट्रेनिंग करीत आहेत. विशेष म्हणजे या फेलोशिपमध्ये प्रत्यक्ष रुग्णांना उपचार देण्याची संधी (हॅन्ड ऑन ट्रेनिंग) उपलब्ध करून दिली जाते. डॉ. बांगर स्वत: थांबून उपचारावेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यामूळे उपचारांबाबतचे कौशल्य अचूकरित्या अवगत करणे या विद्यार्थ्यांना शक्य होते आहे. विशेष म्हणजे हॅन्डस ऑन ट्रेनिंग घेतल्याने या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावण्यासही मदत होते. केवळ रुग्णांना सर्वोत्तम उपचार सेवा देण्यावरच कार्य न थांबविता प्रशिक्षित डॉक्टरांची नवी पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण कार्य डॉ. बांगर यांनी या माध्यमातून सुरू केले आहे. रुग्णांचा वाढता ओघ आणि एकावेळी केवळ तीनच विद्यार्थ्यांना हॅण्डस ऑन ट्रेनिंगसाठी प्रवेश दिला जात असल्याने त्यांना शिकण्याची भरपूर संधी उपलब्ध होते आहे. अॅडव्हान्स प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा या हॅण्डस ऑन ट्रेनिंग सेंटरचा उद्देश असल्याची माहिती डॉ. बांगर यांनी यावेळी दिली. 

पुर्वीच्या काळात पोट उघडून शस्त्रक्रिया केल्या जात. यूरोपात १९९६ मध्येच टाक्याच्या शस्त्रक्रिया बंद केल्या आहेत. आपल्याकडेही लॅप्रोस्कोपीचे महत्व वाढत असून त्याचे फायदेही रुग्णांच्या लक्षात येत आहेत. शस्त्रक्रियेमूळे होणाऱ्या वेदना कमी होत असून जखमा भरुन यायलाही वेळ लागत नाही. लॅप्रोस्कोपीमुळे रुग्णाचा रुग्णालयातील मुक्कामही कमी झाला असून रुग्ण लवकर घरी जाऊ शकतो. तसेच दैनंदिन कामेही काही दिवसांतच सुरू करू शकतो अशी माहिती डॉ. बांगर यांनी दिली. 

-निराश दांपत्यांना अपत्यप्राप्तीचा ‘स्पर्श’ राणेनगर येथेच स्पर्श इन्फर्टिलीटी सेंटर असून या सेंटरच्या संचालक डॉ. अनिता बांगर या शहर आणि जिल्ह्यातील प्रथितयश स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत. अनेक वर्ष अपत्यप्राप्तीचे सुख प्राप्त करू न शकलेल्या दांपत्यांना हे सुख मिळवून देण्याची किमया डॉ. बांगर यांनी अत्याधुनिक उपचारांद्वारे साधली आहे. वंध्यत्वावर शास्त्रोक्त पध्दतीने उपचार करणाऱ्या या सेंटरमध्ये आयव्हिएफ, इक्सी यांसारखे उपचार घेण्यासाठी केवळ शहर आणि जिल्ह्यातूनच नाही तर राज्याच्या अनेक भागांतून दांपत्य येत असतात. डॉ. अनिता यांनी देखील डी. वाय. पाटील महाविद्यालय, बी जे मेडिकल महाविद्यालय ससून येथून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर मुंबई, गुजरात वंध्यत्वाशी संबंधित शिक्षण घेतले आहे. याशिवाय जर्मनीतून फेलोशिप पूर्ण केली आहे. गेल्या १४ वर्षांत सुमारे साडे नऊ हजार यशस्वी प्रसूती डॉ. अनिता बांगर यांनी केल्या आहेत.

COMMENTS