गट शिक्षणाधिकार्‍यांना काढल्या जाणार नोटीसा ; शाळाबाह्य मुलांची माहितीच पाठवली नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गट शिक्षणाधिकार्‍यांना काढल्या जाणार नोटीसा ; शाळाबाह्य मुलांची माहितीच पाठवली नाही

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील 14 तालुक्यांत असणार्‍या गट शिक्षणाधिकार्‍यांना नोटीसा काढून त्यांचा खुलासा मागवला जाणार आहे. शाळाबाह्य मुलांची माहिती

कर्जतच्या ’तहसील’मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेशाची पायमल्ली
दौड यांच्या भूमिकेनंतर पाथर्डी तालुक्याचे राजकारण तापले
निळवंडेचा लोकार्पण कृती समितीचे आंदोलक स्थानबद्ध

अहमदनगर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील 14 तालुक्यांत असणार्‍या गट शिक्षणाधिकार्‍यांना नोटीसा काढून त्यांचा खुलासा मागवला जाणार आहे. शाळाबाह्य मुलांची माहिती संकलित करून ती वरिष्ठ कार्यालयास पाठवण्याच्या सूचना त्यांना दिल्या गेल्या होत्या. मात्र, या कामात कुचराई केल्याने व माहितीच पाठवली नसल्याने या सर्वांना नोटीसा देऊन त्यांचा खुलासा घेतला जाणार आहे.
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्यावतीने 5 ते 20 जुलै दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शोध मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचा कालावधी संपून अद्याप एकाही तालुक्याचा परिपूर्ण अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही. यामुळे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे जिल्ह्यातील 14 गटशिक्षणाधिकारी यांना नोटीस काढणार आहेत.
दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रभावीपणे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. तसेच एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाहीत, यासाठी गावातील प्रत्येक कुटूंबाला भेट देऊन स्थलांतरीत झालेले आणि स्थलांतर होवून आलेल्या कुटूंब आणि त्यांच्या मुलांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी 5 ते 20 जुलैदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. यात अ, ब, क आणि ड प्रपत्रात माहिती संकलित करण्यात आली. यात अ प्रपात्र गावातील प्रत्येक कुटूंबाचा तपाशील, ब प्रपत्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा तपाशील, क प्रपत्रात स्थलांतर होवून गेलेले विद्यार्थी आणि ड प्रपत्रात स्थलांतरीत होवून आलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीचा समावेश होता. मात्र, मोहीम कालावधी संपूण पाच दिवस लोटले असले तरी अद्याप शाळाबाह्य मुलांचा तालुकानिहाय अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला मिळालेला नाही. यामुळे शिक्षणाधिकारी पाटील यांनी 14 तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांना नोटीस काढण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS