लोणंद / प्रतिनिधी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 28 जूनला सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असून पालखीचा जिल्ह्यातील पहिला अडीज दिवसांचा
लोणंद / प्रतिनिधी : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 28 जूनला सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असून पालखीचा जिल्ह्यातील पहिला अडीज दिवसांचा मुक्काम हा लोणंद येथे असणार आहे. पालखी सोहळ्यात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये. म्हणून पालखी मार्गातून जिथे-जिथे अतिक्रमणे झाली आहेत. त्या सर्व अतिक्रमण धारकांना लोणंद नगरपंचायतीने अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दिले आहे.
लोणंद नगरपंचायत हद्दीतील शासकीय जागेवर तमेच सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना व्यवसायासाठी आपले इमारती पुढे पत्रा शेड-ओटे बांधकाम करुन अतिक्रमण केल्याबाबत सर्वच अतिक्रमण धारकांना नोटिसा देलेल्या आहेत. महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 180, 181 नुसार हे नोटीस दोन दिवसांपूर्वीच दिलेले असून अतिक्रमण न हटविल्यास त्याच कलमांद्वारे पुढील कार्यवाही 20 जून रोजी करण्यात येणार आहे.
दिलेल्या नोटीसाद्वारे असे कळविण्यात आले आहे की, लोणंद नगरीत दरवर्षी प्रमाणे संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा होत असतो. याही वर्षी माऊलींचा पालखी सोहळा लोणंद शहरात अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी येत आहे. त्यानुषंगाने सोहळ्यामध्ये दर्शन रांग तसेच भाविकांची संख्या मोठी असते. आपण लोणंद नगरपंचायतीची कोणत्याही प्रकारची पूर्व परवानगी न घेता शासकीय जागेवर तसेच सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना व्यवसायासाठी आपले इमारती पुढे पत्रा शेड-ओटे बांधकाम करुन अतिक्रमण केलेले आहे. अतिक्रमण नोटीस मिळाल्यापासून 24 तासात काढून टाकावे. अन्यथा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 180, 181 मधील तरतूदीनुसार अतिक्रमण नगरपंचायत यंत्रणेकडून दि. 20 जून रोजी काढण्यात येईल. अतिक्रमन काढताना साहित्य जप्त करुन नगरपंचायत कार्यालयात जमा करण्यात येईल. तसेच अतिक्रमण काढणे कामी होणारा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल. याची नोंद घ्यावी, असेही नोटीसीमध्ये नमूद केले आहे.
COMMENTS