Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वेक्षणाला दांडी मारणार्‍या 130 कर्मचार्‍यांना नोटीसा

पुणे : मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सर्वे

पहिल्याच पावसांत मुंबईची तुंबापुरी
तलावात बुडून तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
सरकारची जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का?

पुणे : मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या समाजाचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सर्वेक्षणात अडथळ्याची शर्यत दुसर्‍या दिवशीही सुरूच आहे.
सर्व्हर डाऊन होणे, लॉगइनसह अनेक तांत्रिक अडचणी येत असून एका कुटुंबाची माहिती घेण्यास 20 मिनिटांचा वेळ लागत आहे. दरम्यान, सर्वेक्षण कामाला दांडी मारणार्‍या 130 कर्मचार्‍यांना नोटीसा बजाविल्या असून चोवीस तासात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा निलंबन करण्याचा इशारा दिला आहे. करसंकलन विभागाच्या 17 झोननुसार घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशी जात असल्यास त्या कुटुंबाची संपूर्ण माहिती भरून घेण्यात येत आहे. 182 छोटे पर्याय प्रश्‍न आहेत. एका कर्मचा-यास दिवसाला 50 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या कर्मचार्‍याला सात दिवसांत 400 घरांना भेट द्यावी लागणार आहे.

COMMENTS