Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवींच्या नावाला नव्हे, तर बाहेरच्या हस्तक्षेपाला विरोध

खासदार विखेंनी भूमिका केली स्पष्ट

अहमदनगर/प्रतिनिधी ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, यासंबंधी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर

गणेशची सत्ता गेली तरी ऋणानुबंध कायम ः खासदार डॉ. विखे
मनपाच्या 32 कोटींचा गैरवापर होऊ देणार नाही
शिवसेना त्यांनी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली

अहमदनगर/प्रतिनिधी ः पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला माझा विरोध असण्याचे काहीच कारण नाही. मात्र, यासंबंधी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढून गैरसमज पसरविला जात आहे. अहिल्यादेवींच्या नावाला नव्हे, अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या विषयात बाहेरच्या हस्तक्षेपाला माझा विरोध आहे, असे स्पष्टीकरण भाजपचे नगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी शनिवारी येथे दिले. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दरमहा ’लव्ह जिहाद’ किंवा घरातून पळून जाण्याची 150 प्रकरणे घडत असून यामुळे समाजास धोका निर्माण झाला आहे व सामाजिक तेढ निर्माण होते आहे. त्यामुळेच यावर निर्बंध घालणारा कायदा आवश्यक असल्याची मागणी होत आहे, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले.
अहमदनगरचे अहिल्यादेवी नगर नामांतर करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे व विधानसभेच्या आदेशाने याबाबत प्रस्ताव करण्याचे काम नगर मनपाने सुरू केले आहे.

या पार्श्‍वभूमीवर, नगरचे खासदार डॉ. विखे यांचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला विरोध असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. त्यामुळे यासंबंधी पुन्हा डॉ. विखे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, अहमदनगरला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली. त्यावर प्रसिद्धी माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता आपण सांगितले की, नामांतराचा विषय स्थानिक पातळीवर ठरविला जाईल. येथील लोकप्रतिनिधी, नागरिक, विविध संस्था यांची मते विचारात घेऊन स्थानिक पातळीवरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. बाहेरच्या लोकांनी हे परस्पर ठरवून नये, असे माझे मत मांडले व त्यावर आजही ठाम आहे. याचा अर्थ अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला माझा विरोध आहे, असे नाही. मुळात अहमदनगरचे नामांतर करायचे का? नवे नाव काय ठेवायचे? यासंबंधी येथील लोकप्रतिनिधींमध्ये, स्थानिक नागरिकांमध्ये एकमत होऊन निर्णय होणे आवश्यक आहे. नामांतरासंबंधीची मागणी मागील निवडणूक काळात किंवा त्यानंतरही मोठ्या प्रमाणात कोणी केलेली नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून स्थानिकांची मते विचारात घेऊनच पुढील भूमिका मांडावी लागणार आहे. लोकांची मागणी असेल, बहुमताने निर्णय होणार असेल तर त्याप्रमाणे प्रक्रिया राबविली जाईल. मात्र, माझा अहिल्यादेवींच्या नावाला विरोध आहे, असा गैरसमज करून घेऊन आंदोलने करणे चुकीचे आहे, असेही डॉ. विखे पाटील म्हणाले.

विष कालवण्याचा प्रयत्न – अहमदनगरमधील जनता जोपर्यंत याबाबत मागणी करीत नाही, तोपर्यंत जिल्ह्याबाहेरील कोणत्याही व्यक्तीने नामांतराची मागणी करणे संयुक्तिक वाटत नाही. अहमदनगरची परंपरा वेगळी आहे. येथे समाजकारण आणि राजकारण अशी जोड देऊन काम केलेले अनेक नेते होऊन गेले. अहमदनगर जिल्हा हा संवेदनशील जिल्हा आहे. राज्याच्या राजकीय पटलावर जिल्ह्याची वेगळी ओळख आहे. सामाजिक सलोखा अनेक वर्षे या जिल्ह्याने टिकवून ठेवला आहे. अशा परिस्थितीत कारण नसताना काही लोक यात विष कालविण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनी ते बंद करावे, असे आवाहन करून डॉ. विखे म्हणाले, नामांतराबाबत प्रस्ताव पाठवण्याचे नगर महापालिकेला सांगितले गेल्याचे समजते. पण जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मनपा एकटी कशी काय घेऊ शकते? जिल्ह्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे मत काय आहे, तेही पाहावे लागेल. किंबहुना जिल्ह्यातील गावपातळीपासून ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन निर्णय होणे अपेक्षित आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

म्हणून, कायदा गरजेचा- ’लव्ह जिहाद’ किंवा घरातून पळून जाण्याच्या प्रकरणांमुळे मुलांना कष्टाने शिकवणार्‍या आई-वडिलांची प्रतिमा मलीन होते आहे. परस्परांवरील विश्‍वास कमी होतो आहे. भविष्यासाठी हे घातक आहे. यावर निर्बंध घालणारा कायदा आवश्यक असल्याची त्यामुळेच मागणी होत आहे, असे स्पष्ट करून डॉ. विखे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार असला तरी हिंदूंचे धर्म परिवर्तन घडवून आणले जात आहे, त्याचे घातक परिणाम समाजात दिसत आहेत. धर्मांतर ही कीड आहे. त्यातून युवकांचे भविष्य धोक्यात येते आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यातील वादंगाकडे लक्ष वेधले असता विखे म्हणाले की, संजय राऊत यांच्या वक्तव्याकडे महाराष्ट्रातील जनता कधी गांभीर्याने पाहात नाही. नारायण राणे मोठे नेते आहेत. त्यांच्याविषयी टीकाटिपणी करणे योग्य नाही. परंतु दोघातील कसरत पाहता प्रत्येक पक्षाने त्यांच्या प्रवक्त्यांवर निर्बंध आणण्याची गरज असल्याचे लक्षात येते, असे भाष्यही विखे यांनी केले.

शिवभक्त पवारांना उत्तर देतील – विरोधी पक्षनेते अजित पवार हे छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते यावर ठाम आहेत तसेच यासंदर्भात काँग्रेस व शिवसेना यांनीही भूमिका स्पष्ट केलेली नाही, याकडे लक्ष वेधले असता खासदार विखे म्हणाले, काँग्रेस भूमिका स्पष्ट करू शकत नाही. शिवसेना आता केवळ दोन आमदारांपुरती शिल्लक राहिली आहे. पण, पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर छत्रपतींचे अनुयायी व शिवभक्त येणार्‍या निवडणुकीत त्यांना योग्य उत्तर देतील.

COMMENTS