Homeताज्या बातम्यादेश

‘फिफा वर्ल्ड कप’ मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा, 

सध्या फिफा विश्वचषक २०२२ची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फिफा सोहळ्याला हजेरी लावली होती. आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा फिफ

‘नोरा फतेही’चा अश्रूंचा बांध फुटला, म्हणाली पछताओगे…
खंडणी प्रकरणी नोरा फतेहीची पुन्हा होणार चौकशी
नोरा फतेहीला पाहून ही मुलगी ढसाढसा रडू लागली

सध्या फिफा विश्वचषक २०२२ची सगळीकडेच चर्चा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी फिफा सोहळ्याला हजेरी लावली होती. आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचा फिफा वर्ल्ड कपमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नोराने फिफा वर्ल्ड कपमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘गरमी’, ‘ओ साकी साकी’  गाण्यांमधून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या नोराने फिफा वर्ल्ड कपच्या फॅनफेस्ट इव्हेंटमध्येही डान्सने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नोराने तिच्या तालावर चाहत्यांनाही ठेका धरायला भाग पाडलं. डान्स सादर केल्यानंतर नोराने मंचावर भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावला. यावेळी तिने ‘जय हिंद’ अशा घोषणाही दिल्या.

COMMENTS