नवी दिल्ली ः प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त घोषित करण्यात येणार्या पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकन-शिफारशी सादर करायला 1 मे 2024 पासून सुरुवात झाल

नवी दिल्ली ः प्रजासत्ताक दिन 2025 निमित्त घोषित करण्यात येणार्या पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकन-शिफारशी सादर करायला 1 मे 2024 पासून सुरुवात झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने दाखल करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकने- शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन (हीींिीं://रुरीवी.र्सेीं.ळप) दाखल करता येतील.
पद्म पुरस्कार म्हणजेच पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हा पुरस्कार ’अतुलनीय कार्याला’ विशेष ओळख प्रदान करण्याचा प्रयत्न असून कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे/विषयांमध्ये विशिष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी/सेवेसाठी दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहेत. डॉक्टर आणि वैज्ञानिक वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणारे सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत. पद्म पुरस्कारांचे रूपांतर जनतेचे पद्म पुरस्कार यामध्ये करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. म्हणून, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी स्व-नामांकनासह इतरांचे नामांकन/शिफारशी देखील कराव्यात. नामांकने /शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात शिफारस केलेल्या व्यक्तीची संबंधित क्षेत्र /सेवेतील विशिष्ट आणि अतुलनीय कामगिरी/सेवा वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) स्पष्टपणे मांडलेली असावी.
COMMENTS