मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर टाटा ट्रस्टचे पुढील उत्तराधिकारी कोण ? असा सवाल उपस्थित होत होता. अखेर या टाटा ट्रस्टच्
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर टाटा ट्रस्टचे पुढील उत्तराधिकारी कोण ? असा सवाल उपस्थित होत होता. अखेर या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र बंधू आहेत. बोर्डाने त्यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केले. टाटा ट्रस्टने शुक्रवारी यासंबंधी बोलावलेल्या एका बैठकीत नवे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्ट व टाटा ट्रस्टमधील एक विश्वस्त आहेत. त्यांची कार्यशैली रतन टाटा यांच्याहून फार वेगळी आहे. त्यांना प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे आवडते. रतन टाटा यांच्या वडिलांचे नाव नवल टाटा तर आईचे नाव सोनी टाटा होते. 1940 च्या दशकात नवल टाटा आणि सोनी टाटा यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर नवल टाटा यांनी सिमोन यांच्याशी लग्न केले. या दोघांच्या मुलाचे नाव नोएल टाटा आहे. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्टचे ट्रस्टी आहेत. दोन्ही ट्रस्टची त्यांच्याकडे 66 टक्के भागिदारी आहे. टाटा सन्स ही टाटा ग्रुपची पेरेंट कंपनी आहे. नोएल टाटा हे गेल्या 40 वर्षांपासून टाटा ग्रुपचे सदस्य आहेत. टाटा इंटरनॅशनल, वोल्टास, टाटा इनवेस्टमेंट कॉर्पोरेशनचे चेअरमन आहेत.
COMMENTS