स्टॉकहोम : यंदाचा शांततेचा नोबल पुरस्कार जपानमधील निहॉन हिदानक्यो या संस्थेला जाहीर झाला आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या सं
स्टॉकहोम : यंदाचा शांततेचा नोबल पुरस्कार जपानमधील निहॉन हिदानक्यो या संस्थेला जाहीर झाला आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेने मोठे काम केले. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावे, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. हे हिबाकुशा निहोन हिदांक्यो संस्थेच्या माध्यमातून जगभरात त्यांच्या दुःखाच्या आणि वेदनादायक आठवणी शेअर करतात. नोबेल समितीने म्हटले आहे की, एके दिवशी अण्वस्त्र हल्ल्यांना सामोरे गेलेले हे लोक आता आपल्यासोबत नसतील, परंतु जपानची नवीन पिढी त्यांच्या आठवणी आणि अनुभव जगासोबत शेअर करत राहील आणि जगासाठी अण्वस्त्रे किती धोकादायक आहेत याची आठवण करून देईल.
COMMENTS