सन २०२३ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जॉन फोस्से या नॉर्वेजिअन लेखकाला देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या संदर्भात विशेष दखल घेण्याची बाब अशी की,
सन २०२३ चा साहित्यातील नोबेल पुरस्कार जॉन फोस्से या नॉर्वेजिअन लेखकाला देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या संदर्भात विशेष दखल घेण्याची बाब अशी की, हा पुरस्कार देताना साहित्याचा सन्मान केला तर आहेच; परंतु, त्या साहित्यामधून प्रतिबिंबित होणाऱ्या भावना आणि विचारांना अधिक महत्त्व देण्यात आले आहे. जागतिकीकरणाचा काळ सुरू झाला तसा माणूस हा सैरभैर झाला आहे. जीवनातील दैनंदिन गतिमानता ही भौतिक स्वरूपात वाढत गेली. परंतु, मन मात्र विचलित होत गेलं! त्याचे परिणाम माणसाच्या एकूणच वैयक्तिक आणि भौतिक जीवनावर होत गेले. परंतु, जॉन फोस्से यांचे साहित्य खासकरून नाटक आणि कविता ज्या जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाल्या, आणि आजही संपूर्ण युरोपीय देशांमध्ये त्यांच्या साहित्याची नाटके ही गाजत असतात. धर्माने कॅथोलिक असतानाही त्यांनी धर्माच्या भक्तीच्या अडंबरापेक्षा त्यांनी अध्यात्माला फार जाणीवपूर्वक जोपासले आहे. एका मुलाखतीत तर त्यांनी अध्यात्म आणि कम्युनिस्ट विचार माझा जीवनाचा पाया आहे, असे म्हटले होते. साहजिकच आहे की, अध्यात्म हे माणसाला अंतर्यामीचे माणूसपण दाखवते. त्याचबरोबर त्याच्यातील मानवतेलाही जागवते. पण, त्याचबरोबर कम्युनिजम हा जगातील कोणत्याही माणसाचा भाकरीच्या प्रश्नावर बोलतो. मानवतेचा पहिला धागा हा इतरांच्या भुकेल्या शमविण्यातूनच सुरू होतो. याचा अर्थ जॉन फोस्से यांच्या मनात असणारी अध्यात्मिक भावना ही माणसाच्या प्रती संवेदनशील आहे, आणि म्हणूनच ती जागतिक पातळीवर स्वीकार्य देखील आहे! त्यांच्या साहित्याला नोबेल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले; पण, त्याचबरोबर जगाची एकूणच भावना आगामी काळामध्ये कशी असावी, कोणत्या दिशेने जावं, याचं एक प्रकारे सुतोवाच नोबेल या जागतिक संस्थेने स्वतः देखील केलं आहे. कारण, जागतिकीकरणाच्या काळानंतर जगभरातच माणूस हा भरडला गेला आहे. त्याचं मानवी अधिष्ठान नक्कीच भ्रमित झाले आहे. अशा काळात जॉन फॉस्से यांच्या साहित्याची नोबेल पुरस्कारासाठी निवड करणे, ही बाब फार महत्वपूर्ण आहे. तसे पाहिले तर नॉर्वेजिअन लेखक असणारे जॉन फाॅस्से हे नॉर्वे मधील भाषिक अल्पसंख्याक देखील आहेत. कारण, ते ज्या मध्ययुगीन भाषेचा वापर करतात, ती एक प्रकारे नार्वेची ग्रामीण बोलीभाषा आहे. ही बोलीभाषा असणाऱ्या लोकांची संख्या नार्वेमध्ये फक्त दहा टक्के आहे. याचाच अर्थ ते नॉर्वे मधील भाषिक अल्पसंख्याक देखील आहेत. जगण्याच्या अनुभूतीतून त्यांचे साहित्य निर्माण झाले असल्यामुळे, त्या साहित्याला त्यांच्या अंतर्मनाचा एक गाभा स्पर्श करतो. म्हणून त्यांचं साहित्य जगातल्या सर्वच माणसांना आपल्या मनातील एक अंतर्यामी बाजू उलगडून दाखवण्याचा किंवा ती प्रकटून दाखवण्याचा एक प्रयत्न त्यांच्या साहित्यातून केला जातो. माणसाच्या मनाला त्यांचं साहित्य हे साद घालत. त्यामुळे जगाच्या अनेक भाषेमध्ये त्यांच्या नाटकांच भाषांतर झाले आहे. जाॅन फास्से यांचं पहिलं साहित्य १९८३ मध्ये रेड अंड ब्लॅक या नावाने आलं. ज्यामध्ये त्यांच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब दडलेले आहे. या नाटकापासून त्यांनी कधीही मागे फिरून पाहिले नाही. ६४ वर्षीय जॉन फास्से हे आधुनिक काळातील एक आध्यात्मिक परंपरा घेऊन येणारे लेखक आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनावर अंतर्मनाची छाप आहे. त्यामुळे त्यांची नाटके, कविता आणि एकंदरीत साहित्य जेव्हा प्रेक्षक आणि वाचकांच्या समोर येतं, तेव्हा, प्रेक्षक आणि वाचकांच्या अंतर्मनालाही ते स्पर्श करून जातं. त्यांच्या साहित्याची मागणी जगभरात वाढली आहे. पण, त्याहीपेक्षा त्यांच्या साहित्यावर आधारलेली नाटके आणि त्यांनी लिहिलेली नाटकं ही जगभरात सातत्याने प्रयोगशील राहिले आहेत. यातच जाॅन फास्से यांच्या लेखनाची शक्ती आपल्याला दिसून येते.
COMMENTS