Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोणताच धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही

भागवत वारकरी संमेलनात खा. शरद पवारांचे प्रतिपादन

पुणे/प्रतिनिधी ः समाजामध्ये आज अस्वस्थता वाढत चालली आहे. धर्माच्या नावावर वाद निर्माण केले जात आहेत, मात्र जगातील कोणताच धर्म चुकीच्या प्रवृत्तीच

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी
शरद पवारांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी
दुष्काळाप्रती सरकारची अनास्था

पुणे/प्रतिनिधी ः समाजामध्ये आज अस्वस्थता वाढत चालली आहे. धर्माच्या नावावर वाद निर्माण केले जात आहेत, मात्र जगातील कोणताच धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे समर्थन करत नाही, त्यामुळे प्रत्येक बाबीला धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. आळंदीमध्ये भागवत वारकरी संमेलनात वारकर्‍यांना संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हे आणि संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना खा. पवार म्हणाले की, भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणूसकी घराघरात पोहोचविण्याचा संदेश करते. आज समाजामध्ये एक अस्वस्थता आहे. चुकीच्या प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस जो अस्वस्थ आहे त्याची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी त्याला मानसिक समाधान देण्यासाठी त्याचे मन शक्तिमान करण्यासाठी जो काही पर्याय समाजासमोर आहे त्याच्यामध्ये भागवत वारकरी संमेलनाचा विचार आपण दुर्लक्षित करू शकत नाहीत. आज सबंध देशामध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावलं टाकत आहेत. पण दुसर्‍या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला, धर्म आणि कट्टर विचाराच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसर्‍या बाजूला आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही. चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याच्या संबंधित खबरदारी घेतो. आज सबंध देशामध्ये एका बाजूला सनातन धर्म आणि दुसर्‍या बाजूला भागवत धर्म यासंबंधीची चर्चा हल्ली मोठ्या प्रमाणावर होत असते. मी एकच गोष्ट सांगतो, आम्ही याकडे बघत असताना सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी विचारधारा आहे, समाजाला शक्तिशाली करणारी ही विचारधारा आहे, देशाला कष्टकर्‍यांची महासत्ता बनवणारी जी विचारधारा ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संस्थान आहे. ती विचारधारा जतन करणे ही तुमची माझी जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले.

सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका महत्वाची – हा देश अनेक जाती-धर्मांचा भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे तो विचार हिंदूंचा असो की मुस्लिमांचा की अन्य घटनकांचा असो त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका प्रकर्षाणे मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणे, ते रुजवणे, ते शक्तिशाली करणे आज खर्‍या अर्थाने आवश्यक आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो, असेही यावेळी शरद पवार यांनी सांगितले.

COMMENTS