Homeताज्या बातम्यादेश

कर्जदारांना दिलासा नाहीच; रेपोरेट ‘जैसे थे’!

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची घोषणा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने गुरूवारी व्याजदर आणि रेपोेरेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जदारांची पुन्हा एकदा निराशा

पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा
सार्वजनिक क्षेत्रात काम करताना अण्णा हजारे यांचे मार्गदर्शन मोलाचे – आदिती तटकरे
पेट्रोलपंप कामगाराने मालकाला घातला 28 लाखांचा गंडा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने गुरूवारी व्याजदर आणि रेपोेरेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्जदारांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी किंवा नंतर व्याजदर कमी होतील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांची अपेक्षा ही फोल ठरली.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीच्या शेवटच्या दिवशी झालेल्या निर्णयांची माहिती त्यांनी दिली. तर एमपीसी बैठक मंगळवारपासून (ता. 6) सुरू झाली होती. यावेळी रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. तर सलग आठव्यांदा रेपो दर दर ’जैसे थे’ ठेवत रेपो दर केवळ 6.50 टक्के ठेवण्यात आल्याची माहिती गव्हर्नर दास यांनी दिली आहे. व्याजदरात कोणताही बदल करणार नसल्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे. पतधोरण समितीतील सहापैकी चार सदस्यांनी व्याजदर जैसे थे ठेवण्याची शिफारस केली, तर दोन सदस्यांनी व्याजदर कपातीचा मुद्दा उपस्थित केला आहे. गेल्या वेळी पतधोरण समितीच्या बैठकीत एकूण सहा सदस्यांपैकी दोन सदस्यांनी तातडीने व्याजदर कपातीची भूमिका मांडली होती. आजच्या पद्धतीवरून बैठकीस आणखी दोन जण याच भूमिकेला पाठिंबा देतील किंवा त्या दृष्टीने पावले उचलण्याची गरज व्यक्त करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार दोघांनी व्याजदर कमी करण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर सरप्राइज कपात जाहीर करतात का, याकडे सर्वांची नजर होती. सद्यस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थांमधील उलथापालथ लक्षात घेता रिझर्व बँकेने व्याजदर कपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पुढील दोन महिन्यात मात्र व्याजदर कमी करण्याकडेच बँकेचा कल असेल हे निश्‍चित असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

चेक अवघ्या काही तासांत होणार क्लिअर – रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या पतधोरण आढावा बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी चेक क्लिअरविषयावर भाष्य केले. त्यानुसार रिझर्व्ह बँक आणि देशातील सर्व बँका आता चेक क्लिअरिंगसाठी नवी पद्धत स्वीकारणार आहेत. या पद्धतीनुसार तुम्ही दिलेला चेक आता पुढील काही तासात क्लिअर होऊन तुम्ही ज्या व्यक्तीला चेक दिला त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा होतील. सध्याच्या परिस्थितीत आपण चेक दिल्यानंतर समोरच्या व्यक्तीला किमान दोन दिवस पैसे जमा होण्यासाठी वाट पाहावी लागते. तंत्रज्ञानाच्या आधारे आता चेक क्लिअरिंग अवघ्या काही तासात करता येणे शक्य आहे. त्यामुळे ही नवी पद्धत अवलंबत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण आढाव्याच्या शेवटी बोलताना सांगितले.

COMMENTS