Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शक्तिपीठ महामार्गावर आक्षेप नाही : मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण

मुंबई ः राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थखात्याने शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली होती

सर्व यंत्रणांनी प्रकल्प व्यवस्थापन माहिती प्रणाली कार्यान्वित करावी : कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारातून मिरजगावच्या विद्यार्थ्यांची विधानभवन भेट 
राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुंबई ः राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थखात्याने शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य कर्जबाजारी होण्याची भीती व्यक्त केली होती, त्यावर बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गावर कोणताही आक्षेप अर्थ मंत्रालयाने घेतला नाही, अर्थ मंत्रालयाचे कामच या सर्व गोष्टी पॉइंट आऊट करण्याचे असते. त्यामुळे अर्थ विभागाने आक्षेप नोंदवला असे म्हणता येत नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, एक महामार्ग बनतो तेव्हा तो अर्थव्यवस्थेची दालने उघडतो. 12 हजार कोटींची गुंतवणूक आपण पायाभूत सुविधांमध्ये करतो तेव्हा त्यातला परतावा 12 हजार कोटींहून कितीतरी कोटी जास्त असतो. तो आपल्या अर्थव्यवस्थेला विस्तारित करतो आणि ते कर्ज परत करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त क्षमता निर्माण करतो. त्यामुळे जगातले सर्वच देश हे कर्जातून पायाभूत सुविधा निर्माण करतात. कारण, अर्थव्यवस्थेचा नियम आहे की, तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर कर्ज घेतले तर ते उत्तम कर्ज मानले जाते. त्यातून अर्थव्यवस्थेचा विस्तार होतो, अर्थव्यवस्था बळकट होते. रोजगार निर्मिती होते. पण काही लोकांना प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याची सवय आहे. या लोकांनी असाच समृद्धी महामार्गाला विरोध केला होता. पण आज समृद्धीने अनेक जिल्ह्यांचे चित्र बदलले आहे. विशेषतः मराठवाडा व दुष्काळी पट्ट्याचे चित्र बदलायचे असेल तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याचे उत्तर आहे असे फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी टोमण्याऐवजी अलंकाराचा उपयोग करावा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदीच्या सक्तीवरून सरकारवर टीका करणार्‍या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका करतांना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेत टोमणे मारण्यापेक्षा खूप चांगले अलंकार आहे. उद्धव ठाकरे यांनी या अलंकाराचा उपयोग केला तर अधिक चांगले होईल. याहून अधिक मला त्यांना काहीच सांगायचे नाही. कारण, राज्यात हिंदी सक्ती नाही. मराठी सक्ती आहे. हिंदी ऑप्शनल आहे, असे ते म्हणाले.

COMMENTS