नवी दिल्ली ः पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता सर्वपक्षीय खासदार विविध देशात जावून आप

नवी दिल्ली ः पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता सर्वपक्षीय खासदार विविध देशात जावून आपली भूमिका मांडणार असून पाकिस्तानचा भंडाफोड करणार आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली होती. त्यावर खासदार शरद पवार यांनी आंतराष्ट्रीय राजकारणांवर पक्षीय भूमिका नको असे स्पष्ट करत संजय राऊत यांना फटकारले आहे.
या शिष्टमंडळात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध नेत्यांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी या शिष्टमंडळाचा उल्लेख वर्हाड असा केला होता. तसेच इंडिया आघाडीतील या शिष्टमंडळातील सदस्यांना या वर्हाडावर बहिष्कार टाकण्याचेही आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला आहे.
COMMENTS