Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठेकेदाराकडून एकही पैसा घेतला नाही

नगर-मनमाड रस्त्यांच्या प्रश्‍नी आमदार तनपुरे यांचे स्पष्टीकरण

देवळाली प्रवरा ः नगर-मनमाड महामार्ग अनेक वर्षापासुन नादुरुस्त झाला आहे. अनेक ठेकेदार आले आणि गेले पण महामार्ग दुरुस्त झाला नाही. आमच्यावरही काही

डॉक्टर म्हणून आला आणि पैशांचा गंडा घालून गेला
जिल्ह्यात बाजारपेठा, आठवडेबाजार व धार्मिक स्थळांसह विवाहांवरील बंदी का
आमदार डॉ. लहामटेंची भूमिका संदिग्ध

देवळाली प्रवरा ः नगर-मनमाड महामार्ग अनेक वर्षापासुन नादुरुस्त झाला आहे. अनेक ठेकेदार आले आणि गेले पण महामार्ग दुरुस्त झाला नाही. आमच्यावरही काही नेत्यांनी टक्केवारी घेतल्याचे आरोप केले. परंतू आज शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून सांगतो. ठेकेदाराच्या एका पैसा घेतला असेल तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही असे माजी मंञी, आ.प्राजक्त तनपुरे यांनी नगर मनमाड दुरुस्तीच्या प्रश्‍नावर बोलताना सांगितले. मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथे निषेध सभा घेण्यात आली. त्यावेळी नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीचा विषय निघाला.त्यावेळी आ.तनपुरे यांनी बोलताना सांगितले.
                 सत्ताधारी असतानाही नगर मनमाड महामार्गाचे काम करता येत नाही म्हणून दुसर्‍यावर टक्केवारीचे आरोप करायचे. गेल्या कित्येक वर्षा पासुन महामार्गाचे काम चालू आहे.पण महामार्ग तयार होईना.कुठले ठेकेदार येतात आणि काम घेतात मध्येच काम सोडून जातात. ठेकेदार पळून जाण्यामागे खरे कोणाचे कारस्थान आहे. या कारस्थानापाई कितेक लोकांचे जीव जाण्याचे पाप झाले आहे. स्वतःला काम जमत नाही म्हणून दुसर्‍यावर आरोप करायचे.ठेकेदाराचा एक रुपया खाल्ला असेल तर छञपतीशिवाजी महाराजांसमोर सांगतो ठेकेदाराचा एक पैसा खाल्ला असेल तर पुन्हा निवडणूक लढवणार नाही असे माजी मंञी, आ.प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले. महामार्गाचे काम अनेक ठेकेदारांनी कमी दरात घेतले होते.स्वतःला काम करता येणार नसल्याने दुसर्‍या  आमदारावर टक्केवारीचे आरोप करुन स्वतःची कमकुवत बाजु झाकून ठेवायची.महामार्गावर अनेक जणांचे जीव गेलेत अनेकांचे प्रपंच उघड्यावर पडले आहेत.त्यांची जबाबदारी कोण घेणार.आरोप करणार्‍यांनी किती टक्केवारी घेतली हे एखाद्या ठेकेदाराला सांगायला लावा. टक्केवारी किती घेतली.जर मी एक पैसाही घेतला असेल छञपती शिवाजी महारांनासमोर ठेवून सांगतो पुन्हा निवडणूक लढविणार नाही.असे आ.प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

COMMENTS