Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर जिल्ह्यातील एकही गोशाळेचे काम पैसा अभावी थांबू नये- शेखर मुंदडा

अहमदनगर - अहिल्यानगर येथे गोरक्षक गोसेवक व गोशाळा संचालकांचा मेळावा अतिशय उत्साहाचे वातावरणात पार पडला. गोशाळा व गोरक्षकांचे प्रश्न मार्गी ला

परीटवाडीमधील सौरप्रकल्पामुळे वृक्षतोड
विद्युत ठेकदार 51 हजाराची लाच घेतांना रंगेहात पकडला
काँग्रेस अनुसूचित जाती विभाग जिल्ह्यात सक्षम

अहमदनगर – अहिल्यानगर येथे गोरक्षक गोसेवक व गोशाळा संचालकांचा मेळावा अतिशय उत्साहाचे वातावरणात पार पडला. गोशाळा व गोरक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री तथा पशुसंवर्धन खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पा.हे प्रयत्नशील आहेत.येणाऱ्या निवडणुकीनंतर पशुसंवर्धन खात्यामार्फत 25 लाख रुपयांचे अनुदान तालुक्यातील गोशाळेंना देण्यात येईल.तसेच गोरक्षकांवर चुकून काही गुन्हे त्यांच्यावर पडले असतील.गोरक्षण करताना काही गुन्हे झाले असतील.तर एसपी यांच्याशी बोलून त्यावर सकारात्मकतेने पाऊल उचलून तोडगा काढण्याचे आश्वासन नामदार विखे पाटील यांनी दिले आहे.महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन सर्वात जास्त असल्याने नगर जिल्ह्यात गाईंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.नगर जिल्ह्यातील एकही गोशाळेचे काम पैसा अभावी थांबू नये.एकही गोरक्षक कामापासून वंचित राहू नये.एकही गाय कसायला जाऊ नये.असे प्रतिपादन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी केले आहे. 

नगर-संभाजीनगर रोड पोखर्डी-शेंडी, ता.नगर येथील साईआंनद लॉन येथे गोशाळा संचालक, गोरक्षक, गोसेवक, गोपालक व सामाजिक कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यास अहिल्यानगर जिल्हातील सत्तरहुन अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.तसेच प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुंदडा,पुणे अखिल भारतीय कृषक सेवा संघ मिलिंद ऐकबोटे,महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे सदस्य संजय भोसले, महाराष्ट्र गोसेवा आयोग अमरावती सदस्य डॉ.सुनील सूर्यवंशी यांनी मेळावास मार्गदर्शन केले .राजुभाई दोशी,पांजरापोळ महेश मुनोत,सजय जामगांवकर किरण भळगट,उद्योजक महेश इंदानी, श्रीनिधी सोमानी,प्रशांत भापकर, निखील शिंगवी संजय मरकड ,गजेन्द्र सोनवने ,डाॅ विलास मढीकर ,आदींसह गोरक्षक,गोशाळा संचालक, गोसेवक उपस्थित होते. मिलिंद एकबोटे म्हणाले,गोहत्या मुक्त अहिल्यानगर जिल्हा हे उद्दिष्ट ठेवून नगर येथे मेळावा घेण्यात आला आहे. येथील गोरक्षकांनी तसेच गोशाळा चालकांनी चांगले काम केले आहे. तसेच गोरक्षणाच्या चळवळीसाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी चांगले सहकार्य केले आहे. देशात लोकशाहीचा उत्सव चालू आहे या प्रक्रियेत मतदान करणे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे गोरक्षक व गोशाळेतील संचालक मतदानाच्या प्रक्रियेत आघाडीवर राहतील.  रविन्द्र महाराज सुद्रिक, प्रमिलाताई ढगे यांनी मनोगत व्यक्त केले‌.प्रास्तविक ललित चोरडिया यांनी केले.सुञ संचलन गौतम कराळे यांनी केले तर आभार दिपक महाराज काळे यांनी मानले.

COMMENTS