Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विजबिलाच्या वसूलीसाठी ना. रामराजे यांनी दिलेल्या सूचनेला बळीराजा संघटनेचा विरोध

कराड / प्रतिनिधी : थकीत वीज बिलप्रकरणी महावितरणने शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. हे

खानापूर तालुक्यातील 8 ग्रामपंचायती बिनविरोध; 37 गावात काट्याची टक्कर
महावितरणची डिजीटायजेशनकडे वाटचाल : ऑनलाईन वीजबिल भरणाऱ्यांचे प्रमाण वाढले
जबरदस्तीने वर्गणी मागणार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार : इस्लामपुरात व्यापारी महासंघाचा निवेदनाद्वारे इशारा

कराड / प्रतिनिधी : थकीत वीज बिलप्रकरणी महावितरणने शेतकर्‍यांची वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे ऊसउत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. हे टाळण्यासाठी शेतकरी ज्या कारखान्यांना ऊस घालतात. त्या कारखान्यांकडून महावितरणने विजबिल वसूल करावे, अशी सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यास बळीराजा शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. याप्रकरणी राज्यभर आंदोलन उभे करुन अशा प्रकारे वसुली झाल्यास एकही बँक चालु देणार नाही, असा इशारा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला.
फलटण तालुक्यातील एका कार्यक्रमात सभापती नाईक-निंबाळकर यांनी शेतकर्‍यांच्या शेती पंपाची वीज पुरवठा महावितरणने तोडला. तर त्यास आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल. त्यामुळे ऊस घालणार्‍या शेतकर्‍यांची वीजबिले कारखान्यांनी महावितरणला भरावीत. यासाठी शेतकर्‍यांची संमती आवश्यक असून, तालुक्यातील शेतकर्‍यांनी कारखान्याला तसे संमती पत्र देऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना वीजबिल हे भरावी लागणार आहेत. आगामी काळात कारखान्याच्या माध्यमातून वीजबिले भरल्यास शेतकर्‍यांवर वीज कट करण्याचा प्रश्‍न येणार नाही, असे आवाहन केले होते.
त्याचा संदर्भ देत बळीराजा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील म्हणाले, शेतकरी दिवसरात्र कष्ट करुन ऊसाचे उत्पादन घेतात. अनेक विनंत्या करुन शेतकर्‍यांना ऊस घालावावा लागतो. त्यासाठी करार करुन घेताना ते योग्य प्रकारे घेतला जात नाही. त्यावर आमचा आक्षेप आहे. त्याचबरोबर शेतकर्‍याला कुटुंबाचा खर्च, औषध, लग्न, शिक्षणाचा खर्च असतो. त्यासाठी शेतकर्‍यांनी कष्ट करुन पिकवलेल्या ऊसाचे पुर्ण बिल त्याला मिळायला हवे.
साखर कारखान्याच्या ऊस बिलातुन एक रुपयाही कापून घेवू नये, असा कायदा असल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. तरीही कारखान्यांनी जर ऊस बिलातून महावितरणची वीज बीले घेतली तर त्या विरोधात राज्यभर बळीराजा शेतकरी संघटना आंदोलन उभे करेल. त्याचबरोबर ज्या बँका अशी कपात करतील, त्या बँकाही आम्ही चालू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

COMMENTS