Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सभापती धनखड यांच्याविरूद्ध अविश्‍वास प्रस्ताव ;सोरोस-अदानी प्रकरणावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधकांनी संसदेत सरकारची कोंडी केली आहे. मंगळवारी अधिवेशनाचा 11 दिवस आहे. इंडिया आघा

राज्यात ५२७ टँकर्सने पाणीपुरवठा
महाविकास आघाडीचा जागावाटपांचा खेळ
कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची सुटका

नवी दिल्ली :संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून विरोधकांनी संसदेत सरकारची कोंडी केली आहे. मंगळवारी अधिवेशनाचा 11 दिवस आहे. इंडिया आघाडीच्या वतीने काल राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडण्याची तयारी केली आहे. धनखड यांच्याविरोधातील अविश्‍वास प्रस्तावाची नोटीस विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेचे सरचिटणीस पीसी मोदी यांना दिली. या नोटीसवर काँग्रेस, टीएमसी, आप, सपा, डीएमके, सीपीआय, सीपीआय-एम आणि आरजेडीसह अनेक पक्षांच्या 60 खासदारांच्या स्वाक्षर्‍या आहेत. धनखड हे पक्षपातीपणे सभागृह चालवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
मंगळवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाले. लोकसभेतील गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. 12 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतरही अदानी-जॉर्ज सोरोसवरून गदारोळ सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज बुधवारपर्यंत तहकूब केले. या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाजही बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, कोणतेही मुद्दे असले तरी आम्ही सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणार नाही. सपा, टीएमसी आणि काँग्रेससह विविध पक्षांचे अनेक खासदार माझ्याकडे आले. रिजिजू यांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण काँग्रेस पक्षाला राज्यसभेत चर्चा करायची आहे, फक्त राहुल गांधींना संसदेच्या कामकाजात भाग घ्यायचा नाही. कदाचित त्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्‍वास नाही. सर्व खासदारांना चर्चा हवी असते, प्रत्येक खासदारासाठी त्याचा संसदीय मतदारसंघ महत्त्वाचा असतो. राहुल गांधी यांच्यासाठी कोणताही मुद्दा महत्त्वाचा नसल्याची टीका रिजिजू यांनी केली.

सोरोस फाउंडेशनची सोनिया गांधींचे कनेक्शन :भाजपचा आरोप
भाजपने काँगे्रसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जॉर्ज सोरोसशी संबंध असल्याच्या आरोप भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी केला आहे. काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या कल्पनेला कथितपणे समर्थन देणार्‍या सोरोस फाउंडेशनने निधी पुरवलेल्या संस्थेशी सोनिया गांधींचे कनेक्शन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर बोलतांना काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी पहिल्यांदाच जॉर्ज सोरोस यांच्यावर भाजपकडून होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.

सरकारला अदानींवर चर्चा नको :खा. प्रियंका गांधी
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी थेट संबंध असल्याचा भाजपचा आरोप प्रियंका यांनी मंगळवारी पूर्णपणे फेटाळून लावला. ही सर्वात हास्यास्पद गोष्ट आहे आणि भाजपवालेच हे करू शकतात. ते 1994 चा विषय आणत आहेत, पण याबद्दल कोणाकडेही रेकॉर्ड उपलब्ध नाही. ते काय बोलतात त्याची मला कल्पना नाही. त्यांना सभागृह चालवायचे नाही, हे मात्र खरे आहे. केंद्र सरकार अदानी मुद्द्यावर चर्चा टाळायची आहे. आम्हाला सभागृह चालवायचे आहे, पण सरकारला अदानींवर चर्चा नको. त्यामुळेच ते असे मुद्दे मांडत असतात. सोरोस प्रकरण 1994 सालचे आहे आणि अदानींवरील चर्चा टाळण्यासाठी ते आता मुद्दाम हे प्रकरण उकरुन काढत आहेत, अशी टीका प्रियंका गांधींनी केली.

COMMENTS