Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आढळगाव ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचावरील अविश्‍वास ठराव नामंजूर

श्रीगोंदा :- सन 2021 मध्ये झालेल्या आढळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ हे विराजमान झाले. त्

त्या दोन ’भोंदू’ बाबांच्या वक्तव्याचा निषेध ः आ.रोहित पवार
विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे यांच्यासोबत या : अ‍ॅड. आगरकर
शुक्राचार्य मंदिरात शिव महापुराण व शुक्र नीती कथेचे आयोजन

श्रीगोंदा :- सन 2021 मध्ये झालेल्या आढळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीचे सरपंच शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच अनुराधा ठवाळ हे विराजमान झाले. त्यांच्या कार्यकाळात ते इतर सदस्यांना विश्‍वासात न घेता कामकाज करत असल्याने तेरा सदस्यांपैकी दहा सदस्यांनी 5 जुलै रोजी तहसील कार्यालयात त्यांच्याविरुद्ध अविश्‍वास ठराव दाखल केला. तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी तातडीने नोटीसा बजावून बुधवारी 10 जुलै रोजी सभा बोलली. ठराव मंजूर होण्यासाठी ठरावाच्या बाजूने दहा सदस्य संख्या आवश्यक असताना नऊच सदस्य उपस्थित असल्याने पुरेशे संख्याबळ नसल्याने ठराव नामंजूर करण्यात आल्याचे तहसीलदार क्षितीजा वाघमारे यांनी घोषीत केले. या वेळी 13 पैकी 9 सदस्य उपस्थित होते तर सरपंच उपसरपंचासह चार सदस्य अनुपस्थित होते.

COMMENTS