Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारताच्या हिताशी कदापी तडजोड नाही

भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्रीय मंत्री गोयल यांचे स्पष्टीकरणमुंबई ः आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना देशाच्या हिताशी कोणतीही तडज

ऊस दरवाढीसाठी शेतकरी संघटनेचे कळंब येथे निवेदन
शेतकरी हक्क मोर्चाच्या दणक्याने तूर खरेदी केंद्र सुरू
अतिवृष्टीची नुकसानभरपाई रखडली; नागरिकांत संताप
Piyush Goyal

भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्रीय मंत्री गोयल यांचे स्पष्टीकरण
मुंबई ः आत्मनिर्भर भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना देशाच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयुष गोयल यांनी दिला. मुंबईत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जागतिक व्यापार करारांबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली आणि विकसित भारताच्या दिशेने उचलल्या जाणार्‍या पावलांचा आढावा मांडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने भारताने जगातील 38 देशांसोबत मुक्त व्यापार करारांच्या चर्चांना गती दिली आहे. या प्रक्रियेमुळे जागतिक व्यापारातील सुमारे 70 टक्के बाजारपेठ भारतासाठी खुली होत असल्याचा दावा गोयल यांनी केला. मात्र, या करारांमध्ये भारताच्या शेती, दुग्धव्यवसाय किंवा संवेदनशील उत्पादनांवर कोणतीही आघात होणार नाही, याची त्यांनी ग्वाही दिली. त्यांच्या मते, जागतिक स्तरावर स्पर्धा करताना देशांतर्गत उद्योग, शेतकरी आणि लघुउद्योग यांचे संरक्षण हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे कोणताही करार हा देशहिताच्या कसोटीवर तपासल्यानंतरच पुढे नेला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचा उल्लेख करताना गोयल यांनी तो विकसित भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल असल्याचे नमूद केले. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवरील गुंतवणूक, उद्योगांना चालना, रोजगारनिर्मिती आणि नवउर्जेला प्रोत्साहन यांसारख्या बाबींवर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बळ देण्यासाठी पतहमी योजना, परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न आणि निर्यातवाढीवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या उपाययोजनांमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.


महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 24 हजार कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या विकासासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचे गोयल यांनी सांगितले. रेल्वे प्रकल्पांसाठी सुमारे 24 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, राज्यातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. पुणे आणि नागपूर येथे ‘विकास केंद्र’ उभारण्याची योजना पुढील पाच वर्षांत राबवली जाणार असून, प्रत्येक शहरासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद दरम्यान वेगवान रेल्वे मार्गाचा आराखडा तयार होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

व्यापार करारात शेतकर्‍यांचे हित अबाधित
मुक्त व्यापार करारांबाबत शेतकरी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात निर्माण झालेल्या शंकांना उत्तर देताना गोयल म्हणाले की, शेतकर्‍यांच्या हिताला बाधा पोहोचेल असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही. अनुवांशिक बदल केलेल्या अन्नपदार्थांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर भारताची भूमिका ठाम आहे. भारतीय शेतकर्‍यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळावा, पण त्याचवेळी देशांतर्गत उत्पादनाला धक्का बसू नये, हा समतोल राखण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

COMMENTS