Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतूळ संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती पोखरकर

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतूळ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती सखाराम पोखरकर यांची एकमताने निवड झाली. अगस्ती स

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार मोनिकाताई राजळे
कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची संशोधनासाठी निवड
श्री क्षेत्र निंबे येथे हरिनाम सप्ताहास प्रारंभ

अकोले ः अकोले तालुक्यातील कोतूळ आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवृत्ती सखाराम पोखरकर यांची एकमताने निवड झाली. अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक मनोज देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष विशाल गोडे, मावळते उपाध्यक्ष रघुनाथ जाधव व संचालक मंडळातील सदस्य, राजेंद्र देशमुख, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते.
उपाध्यक्षपदासाठी निवृत्ती पोखरकर यांच्या नावाची सूचना संचालक रघुनाथ गेनू जाधव यांनी केली. त्यास संचालक बाळासाहेब संपत बेळे यांनी अनुमोदन दिले. याप्रसंगी सुनील देशमुख, सुभाष देशमुख, डॉ. अभिजित देशमुख, कोतूळचे माजी उपसरपंच गणेश पोखरकर, भाऊसाहेब पोखरकर, अमोल देशमुख उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तालुका सहकार विभागाचे सहायक निबंधक वाघमारे व योगेश कापसे यांनी काम पाहिले. निवडीनंतर कोतूळ ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर लोकरे, उपसरपंच संजय देशमुख, योगेश देशमुख यांनी निवृत्ती पोखरकर यांचा सत्कार केला.

COMMENTS