Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळी कडेवळीत सोसायटीच्या चेअरमनपदी नितीन वाळुंज

श्रीगोंदा शहर : टाकळीकडे्वळीत विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी श्री सतीश औरंगे यांच्या उपस्थितीत पार पडली यामध्

उड्डाणपुलाच्या कामासाठी शासकीय जमीन कमी संपादन करत खाजगी जमीन जास्त संपादन करत असल्याचा आरोप
कुंभारीत रविवारी मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबीर
विधानसभेपूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकावे

श्रीगोंदा शहर : टाकळीकडे्वळीत विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन निवड प्रक्रिया निवडणूक अधिकारी श्री सतीश औरंगे यांच्या उपस्थितीत पार पडली यामध्ये श्री नितीन माणिक वाळून यांची चेअरमन पदी निवड करण्यात आली. टाकळीकडेवळीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे मावळते चेअरमन विठ्ठल नामदेव वाळूंज यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने या पदाची जागा रिक्त झाल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये नितीन माणिक वाळुंज यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सतीश औरंगे यांनी जाहीर केले.
यावेळी सोसायटीच्या एकूण 11 संचालकापैकी विठ्ठल नामदेव वाळूंज, सुभाष पंढरीनाथ वाळूज, अशोक बापूराव नवले, नितीन माणिक वाळुंज, महेश भानुदास भिसे, अशोक धोंडीबा सोनवणे, संगीता विक्रम वाळुंज व कांचन अरुण नवले हे आठ संचालक उपस्थित होते. या वेळी मावळते चेअरमन विठ्ठल वाळुंज ऍड अशोक वाळुंज अरुण नवले, दिलीप आबा वाळुंज, विजयसिंह नवले, भगवान आबा खामकर,दिवटे भाऊसाहेब, धर्मराज वाळुंज यांच्यासह उपस्थितांनी नुतन चेअरमन यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS