Homeमुंबई - ठाणेदेश

निशांत कुमार यांचा जेडीयूमध्ये प्रवेश; उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागण्याची शक्यता

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी जनता दल युनायटेड अर्थात जेडीयू या पक्षात अधिकृत प्रवेश केला. पाटण्यातील वी

जावळीतील मोहरे शिंदे गटाच्या गळाला; पदाधिकारी गेले मूळ शिवसैनिक पक्षातच
नायब तहसीलदारासह दोघांवर लाचलुचपतप्रकरणी कारवाई
सकारात्मक विचारसरणी हीच आरोग्याची गुरुकिल्ली – प्रा चंद्रकांत उकिरडे

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार यांनी जनता दल युनायटेड अर्थात जेडीयू या पक्षात अधिकृत प्रवेश केला. पाटण्यातील वीरचंद्र पटेल मार्गावरील पक्षाच्या राज्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात कार्यकारी अध्यक्ष संजय झा यांच्या हस्ते त्यांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले. नितीशकुमार राज्यसभेवर जाण्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे, त्यानंतर भाजपच्या उमेदवाराची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागेल तर, निशांतकुमार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पक्षात प्रवेश केल्यानंतर निशांत कुमार यांनी कार्यकर्ते, नेते आणि बिहारमधील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले की, आजपासून मी पक्षाचा एक साधा कार्यकर्ता म्हणून काम सुरू करत आहे. जनतेची सेवा करणे हेच माझे ध्येय असेल. वडील नितीश कुमार यांनी बिहारच्या विकासासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. वडिलांनी राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केल्याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असून त्याचा मी आदर करतो. पुढील काळात लोकांचा विश्‍वास जिंकण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. ही माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे. अजून बरेच काही शिकायचे आहे. यासाठी जनतेचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आवश्यक आहे, असे ते म्हणाले. सदस्यत्व स्वीकारल्यानंतर निशांत कुमार यांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद घेतले आणि उपस्थित कार्यकर्त्यांचे आभार मानले. राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि निशांत यांच्या समर्थनार्थ घोषणा देत आनंद व्यक्त केला. पक्षातील नेत्यांनीही त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. विधान परिषदेचे सदस्य नीरज कुमार यांनी सांगितले की, निशांत कुमार यांच्या आगमनामुळे पक्ष संघटनाला नवी ऊर्जा मिळेल. त्यांनी लवकरच बिहारभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतला असून संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका निभावतील. निशांत कुमार हे व्यावसायिकदृष्ट्या अभियंता असल्याचेही सांगण्यात आले. पक्ष कार्यकर्त्यांच्या मते, नितीश कुमार यांनी राज्याच्या विकासासाठी जे काम केले, त्याच धर्तीवर निशांतही भविष्यात जनतेसाठी काम करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS