Homeमहाराष्ट्रअहमदनगर

निरंकारी संत समागमचे सांगलीत आयोजन

अहिल्यानगर : सतगुरु माता सुदीक्षा महाराज आणि निरंकारी राजपिता रमित यांच्या पावन सान्निध्यात महाराष्ट्राचा ५९ वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी सांगलवाडी, सांगली येथील विशाल मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. सत्याचा बोध प्राप्त करून आत्ममंथनातून जीवनाची वास्तविकता जाणून मनुष्यजन्माच्या मुख्य उद्देशाकडे वाटचाल करत विश्वात प्रेम, बंधुत्व, शांती व सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हा या समागमाचा मुख्य उद्देश आहे. सुमारे ३५० एकरांच्या विशाल प्रांगणात होणाऱ्या या भव्य आध्यात्मिक आयोजनाच्या तयारीसाठी स्वैच्छिक सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या सेवादलाचे मुख्य संचालक एस. के. जुनेजा यांच्या  हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मिशनच्या प्रचार-प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज आदरणीय मोहन छाब्रा, प्रचार विभागाचे समन्वयक हेमराज शर्मा, समागम समितीचे चेअरमन शंभुनाथ तिवारी, समन्वयक नंदकुमार झांबरे, समितीचे सदस्य, महाराष्ट्रातील सर्व झोनल इंचार्ज तसेच सेवादलाचे क्षेत्रीय संचालक उपस्थित होते.  स्वेच्छा सेवांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना एस. के. जुनेजा यांनी सांगितले की, हा संत समागम सांगली नगरीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. सेवादलाने समागम समितीच्या निर्देशानुसार खांद्याला खांदा लावून निरंतर सेवा करीत मैदानाला सुंदर रूप द्यावे व लाखो भाविकांसाठी उत्तम व्यवस्था उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी मेंबर इंचार्ज मोहन छाब्रा यांनी समस्त मानवतेला संत समागमाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, सतगुरु मानवमात्राच्या कल्याणासाठी जगात प्रकट होतात. या संत समागमाद्वारे पुरातन काळापासून संत-महात्मे व गुरु-पीरांनी दिलेला दिव्य संदेश पुन्हा मानवतेपर्यंत पोहोचविला जाणार असून, हा समागम समस्त मानवतेसाठी कल्याणकारी ठरो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, हा दिव्य संत समागम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक व भक्तगण हजारोंच्या संख्येने श्रद्धेने समागमस्थळी दाखल होऊन पूर्वतयारीसाठी सेवा अर्पण करणार आहेत. नगर झोनमधील सहा जिल्ह्यांतूनही आळीपाळीने व तुकड्यांमध्ये सेवादल सदस्य सहभागी होऊन सेवाकार्यात योगदान देणार असल्याची माहिती सेवादल शिक्षक शिवाजी भोसले यांनी दिली.

तक्रारदाराकडील पुराव्यामुळे आरोपीचा अटकपूर्व फेटाळला
त्यांना आणणार पोलिस ठाण्यात आणि… ; पोलिस राबवणार अभिनव प्रयोग, लॉकडाऊनची केली तपासणी
एकपात्री अभिनय स्पर्धेत श्रद्धा पुंडे व्दितीय

अहिल्यानगर : सतगुरु माता सुदीक्षा महाराज आणि निरंकारी राजपिता रमित यांच्या पावन सान्निध्यात महाराष्ट्राचा ५९ वा वार्षिक निरंकारी संत समागम दिनांक २४, २५ व २६ जानेवारी २०२६ रोजी सांगलवाडी, सांगली येथील विशाल मैदानावर भव्यदिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. सत्याचा बोध प्राप्त करून आत्ममंथनातून जीवनाची वास्तविकता जाणून मनुष्यजन्माच्या मुख्य उद्देशाकडे वाटचाल करत विश्वात प्रेम, बंधुत्व, शांती व सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हा या समागमाचा मुख्य उद्देश आहे.

सुमारे ३५० एकरांच्या विशाल प्रांगणात होणाऱ्या या भव्य आध्यात्मिक आयोजनाच्या तयारीसाठी स्वैच्छिक सेवांचा विधिवत शुभारंभ संत निरंकारी मिशनच्या सेवादलाचे मुख्य संचालक एस. के. जुनेजा यांच्या  हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मिशनच्या प्रचार-प्रसार विभागाचे मेंबर इंचार्ज आदरणीय मोहन छाब्रा, प्रचार विभागाचे समन्वयक हेमराज शर्मा, समागम समितीचे चेअरमन शंभुनाथ तिवारी, समन्वयक नंदकुमार झांबरे, समितीचे सदस्य, महाराष्ट्रातील सर्व झोनल इंचार्ज तसेच सेवादलाचे क्षेत्रीय संचालक उपस्थित होते.  स्वेच्छा सेवांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना एस. के. जुनेजा यांनी सांगितले की, हा संत समागम सांगली नगरीसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. सेवादलाने समागम समितीच्या निर्देशानुसार खांद्याला खांदा लावून निरंतर सेवा करीत मैदानाला सुंदर रूप द्यावे व लाखो भाविकांसाठी उत्तम व्यवस्था उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मेंबर इंचार्ज मोहन छाब्रा यांनी समस्त मानवतेला संत समागमाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, सतगुरु मानवमात्राच्या कल्याणासाठी जगात प्रकट होतात. या संत समागमाद्वारे पुरातन काळापासून संत-महात्मे व गुरु-पीरांनी दिलेला दिव्य संदेश पुन्हा मानवतेपर्यंत पोहोचविला जाणार असून, हा समागम समस्त मानवतेसाठी कल्याणकारी ठरो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हा दिव्य संत समागम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निरंकारी सेवादलाचे स्वयंसेवक व भक्तगण हजारोंच्या संख्येने श्रद्धेने समागमस्थळी दाखल होऊन पूर्वतयारीसाठी सेवा अर्पण करणार आहेत. नगर झोनमधील सहा जिल्ह्यांतूनही आळीपाळीने व तुकड्यांमध्ये सेवादल सदस्य सहभागी होऊन सेवाकार्यात योगदान देणार असल्याची माहिती सेवादल शिक्षक शिवाजी भोसले यांनी दिली.

COMMENTS