Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत सातारच्या ’पोदार इंटरनॅशनल स्कूलचा निरंजन तोरडमल महाराष्ट्रात प्रथम

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधी

हुतात्मा गटाच्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
फटाके उडवण्याबाबत नागरिकांनी पाळावयाच्या मर्यादा जाहीर : पोलीस अधीक्षकांकडून अधिसुचना जारी
विधान परिषदेत निशिकांत पाटील यांची वर्णी लागणार….?

सातारा / प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमधील निरंजन तोरडमल याने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या महाराष्ट्रातील सर्व शाळांमधून प्रथम क्रमांक संपादन केला. त्याला 300 पैकी 278 टक्के गुण मिळाले. या त्याच्या यशाने ’पोदार सातार’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
निरंजनने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे सर्व शिक्षकवृंद यांना दिले. ’वेळेचे उत्तम नियोजन, अभ्यासातील सातत्य यामुळे यश संपादित झाले. परीक्षेच्या काळात जरी शिक्षण ऑनलाईन पध्दतीने होते. तरीही शाळेकडून मला योग्य मार्गदर्शन मिळत होते. तसेच शंका निरसनासाठी शिक्षक वेळोवेळी उपलब्ध होत होते. याचीच फलश्रुती म्हणून मला हे यश मिळवता आले, असे मनोगत निरंजन याने व्यक्त केले.
तसेच पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत (इयत्ता पाचवी) ग्रामीण विभागातून गुणवत्ता यादीत आलेले शाळेचे विद्यार्थी पुढीलप्रमाणे : यशराज जगताप, वेदांत पवार, अधिराज जाधव. तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी) गुणवत्ता यादीमध्ये आलेले शाळेचे विद्यार्थी पुढील प्रमाणे : आदित्य जाधव, आयुष्य डांगे, रिया शहा, साक्षी घनवट, स्वाती कुमार, वेदांत हुर्चनाले निरंजन व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे प्राचार्य ए. के. सिंग, उपप्राचार्या प्राजक्ती गायकवाड, वरिष्ठ प्रशासकीय व्यवस्थापक मनोज जाधव सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS