नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याचे महत्व

Homeताज्या बातम्या

नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याचे महत्व

 संस्कृतमध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु द

Ahmednagar : अहमदनगर शहरात लागणार स्मार्ट एलईडी दिवे (Video)
बस थांबवून कंडक्टरची दरीत उडी | LOK News 24
सोशल मीडियावरील तक्रारीसाठी स्वतंत्र यंत्रणा सुरू करावी

 संस्कृतमध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात. तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे. शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होऊ शकते. तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. 

  • सोमवार २६ सप्टेंबर २०२२ पहिली माळ, पांढरा रंग
  • मंगळवार २७ सप्टेंबर २०२२ दुसरी माळ, लाल रंग
  • बुधवार २८ सप्टेंबर २०२२ तिसरी माळ, निळा रंग
  • गुरुवार २९ सप्टेंबर २०२२ चौथी माळ, पिवळा रंग
  • शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२ पाचवी माळ, हिरवा रंग
  • शनिवार १ ऑक्टोबर २०२२ सहावी माळ, करडा रंग
  • रविवार २ ऑक्टोबर २०२२ सातवी माळ, नारिंगी रंग
  • सोमवार ३ ऑक्टोबर २०२२ आठवी माळ, मोरपंखी रंग
  • मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२ नववी माळ, गुलाबी रंग

COMMENTS