संगमनेर ः काँग्रेस पक्षाचे मा.प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या नव

संगमनेर ः काँग्रेस पक्षाचे मा.प्रदेशाध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर युवक काँग्रेसच्या नवीन पदाधिकार्यांच्या निवडी युवा नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आल्या असून शहराध्यक्षपदी निखिल वेदप्रकाश पापडेजा यांची एक मताने फेर निवड झाली आहे.
वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, युवक आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल पापडेजा यांनी मागील पाच वर्षे शहराध्यक्ष पद अत्यंत सक्षमपणे सांभाळले असून अनेक युवकांना मोठी संधी दिली आहे. त्यामुळे त्यांची शहराध्यक्षपदी फेर निवड झाली आहे. तर कार्याध्यक्षपदी वैष्णव राजकुमार मुर्तडक, अमित गुंजाळ, गोपी जहागीरदार तर उपाध्यक्ष म्हणून सुरभी असोपा, मनोज पुंड, श्रेयश कर्पे, संकेत रघुनाथ आव्हाड, विशाल भारत ढोले, नितीन अंबादास शिंदे यांची निवड झाली आहे.या सर्व नवीन पदाधिकार्यांचे काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ,रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, ड.माधवराव कानवडे, रामहरी कातोरे,सौ.अर्चनाताई बालोडे,सुरेश झावरे, अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, सुभाष सांगळे, हैदर अली, आदींसह विविध पदाधिकार्यांनी अभिनंदन केले आहे.
COMMENTS