राज्यात आगामी चार दिवस थंडीचे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात आगामी चार दिवस थंडीचे

कोरडया हवामानामुळे गारवा वाढला

पुणे प्रतिनिधी : राज्यात पुढील चार दिवस थंडीचे असणार आहे. हवामानातील कोरडेपणा वाढला असून रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. यामुळे गारठा वा

तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम ; शेतकरी अडचणीत 
Superfast Maharashtra : पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 365 कोटी 67 लाख रुपये मंजूर (Video)
दुध उत्पादक शेतकर्‍यांनी नफ्या तोट्याचा विचार करून व्यवसाय करावा : डॉ. प्रशांत पाटील

पुणे प्रतिनिधी : राज्यात पुढील चार दिवस थंडीचे असणार आहे. हवामानातील कोरडेपणा वाढला असून रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. यामुळे गारठा वाढणार आहे. ही स्थिती चार दिवस राहणार असून पुन्हा तापमानातील उषणामान वाढण्याशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
राज्यात सध्या पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारवा वाढला आहे. राज्यात हवामान कोरडे झाले आहे. आकाश निरभ्र असून गेल्या काही दिवसांपासून थंडी ही वाढली आहे. रात्री मोठ्या प्रमाणात तापमान खाली जात आहे. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्याचे तापमान हे 12 डिग्री अंश सेल्सिअस पर्यन्त पोहचले होते. बंगालच्या उपसागरामध्ये दोन दिवसांत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच हिमालयीन विभागात बर्फवृष्टीची शक्यता आहे. याचा परिणाम उत्तकरेकडील राज्यांमधील तापमानात कमी होणार आहे. राज्यात देखील पुढचे चार दिवस तापमान हे कमी राहणार आहे. गुजरातमध्येही किमान तापमान 2-3 अंशांनी कमी होणार आहे. 23 नोव्हेंबरपासून या तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान महाबळेश्‍वरच्या तुलनेत कमी झाले आहेत. या महिन्यात तब्बल तीन वेळा पुण्यातील तापमान घटले होते. मात्र, काल नगर राज्यातील सर्वात थंड जिल्हा होता. अहमदनगरमध्ये 12.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात 12.9 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. या सोबतच सोलापूर, सातारा, परभणी, अमरावती, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील तापमान देखील कमी होते.

COMMENTS