श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाचा उपक्रमईश्वरपूर / प्रतिनिधी : रक्तदान श्रेष्ठदान ही केवळ घोषणा न देता सामजिक बांधिलकीची जाणीव ठेवत 367 जणांनी रक

श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळाचा उपक्रम
ईश्वरपूर / प्रतिनिधी : रक्तदान श्रेष्ठदान ही केवळ घोषणा न देता सामजिक बांधिलकीची जाणीव ठेवत 367 जणांनी रक्तदान करून नववर्षाची सुरुवात केली. येथील यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपूर या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते नववर्षाचे स्वागत रक्तदानाने या उपक्रमाचे.
नववर्षाच्या सुरुवातीला अनेकजण नवनवे संकल्प करत असतात. पण ते काही दिवस टिकून राहतात. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणांनी रक्तदान करण्यासाठी गर्दी केली होती. यात महिला पण आघाडीवर होत्या. रक्तदान श्रेष्ठदान याचे महत्त्व पटवून देण्यासाठी यल्लमा चौकातील श्री गणेश नवरात्रोत्सव मंडळ ईश्वरपूर या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रयत्न करतात. नव्या पिढीला सामाजिक उपक्रमांची जाणीव करून देण्यात पुढाकार घेतात.
या जाणिवेतून सात वर्षांपूर्वी नववर्षाचे स्वागत रक्तदानाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी तो मनावर घेतला. लगेचच कृतीत आणला. सात वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. एका बाजूला 31 डिसेंबर धुमधडाक्यात साजरा करण्यात व्यस्त असणारी तरूणाई. आणि एक जानेवारीला नववर्षाचे स्वागत रक्तदानाने करण्यासाठी झटणारे मंडळाचे कार्यकर्ते 31 डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत रक्तदान शिबीरासाठी मंडप घालताना दिसले.
गुरुवारी सकाळी 10 वाजता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व ईश्वरपूर नगरीचे नगरसेवक आनंदराव पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
ते म्हणाले रक्ताच्या नात्या पलीकडे जावून नवे नाते निर्माण करण्यासाठी रक्तदान शिबीरे उपयुक्त ठरतात. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण एकमेकांना भेटतो, पण आज रक्तदानाने दिलेल्या रक्ताच्या एका पिशवीतुन चार रुग्णांना आयुष्याची भेट दिली गेली. सामाजिक जाणिवेतून आज अनेकांनी रक्तदान केले. आम्ही या रक्तदात्यांचा सन्मान केला. राजरामबापू रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रक्तपेढी कराड यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.

COMMENTS