अकोले : हांडे फाउंडेशन आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन. व्यसनमुक्ती यावर काम करते. 31 डिसेंबरला नवीन वर्षाचे स्वागत करताना नागरिक माठ्या प्रमाणात दारूचे सेवन करतात, अनेकांचे संसार उध्वस्त होतात. हे होऊ नये म्हणून सामाजिक जबाबदारी म्हणून दूध वाटप करून गत वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत केले. जादूगार हांडे सोशल फाउंडेशनच्या सामाजिक विभागाच्या वतीने शिवाजीनगर, अकोले येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष जादूगार हांडे यांनी प्रास्ताविकात संस्थेचे उपक्रम व या व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे महत्व सांगितले. डाॅ.विजय भगत, ह.भ.प.संपत भोर, अगस्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे विकास आरोटे, मनोहर तळेकर, पुष्पा नाईकवाडी, रेणुका धुमाळ, साळवे सर यांनी मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, बी.टी जोरवर, के.टी.मंडलिक, भास्कर तळेकर, खंडू मंडलिक, लांडगे, संतू भोर,सुनील मंडलिक, लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. दूध वाटपानंतर संस्था खजिनदार मंदाकिनी हांडे यांनी आभार मानले.

अकोले : हांडे फाउंडेशन आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, अंधश्रद्धा निर्मूलन. व्यसनमुक्ती यावर काम करते. 31 डिसेंबरला नवीन वर्षाचे स्वागत करताना नागरिक माठ्या प्रमाणात दारूचे सेवन करतात, अनेकांचे संसार उध्वस्त होतात. हे होऊ नये म्हणून सामाजिक जबाबदारी म्हणून दूध वाटप करून गत वर्षाला निरोप देत नव वर्षाचे स्वागत केले.
जादूगार हांडे सोशल फाउंडेशनच्या सामाजिक विभागाच्या वतीने शिवाजीनगर, अकोले येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष जादूगार हांडे यांनी प्रास्ताविकात संस्थेचे उपक्रम व या व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे महत्व सांगितले. डाॅ.विजय भगत, ह.भ.प.संपत भोर, अगस्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे विकास आरोटे, मनोहर तळेकर, पुष्पा नाईकवाडी, रेणुका धुमाळ, साळवे सर यांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रसंगी जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, बी.टी जोरवर, के.टी.मंडलिक, भास्कर तळेकर, खंडू मंडलिक, लांडगे, संतू भोर,सुनील मंडलिक, लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते. दूध वाटपानंतर संस्था खजिनदार मंदाकिनी हांडे यांनी आभार मानले.

COMMENTS