Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू

राहुरी ः नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मुळा धरणात अखेर पाण्याची आवक सुरू झाली आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने आज सकाळी धरणात 2 हज

खासदार लोखंडे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न
Ahmednagar : रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची मागणी -आ.संग्राम जगताप | Lok News24
शरणपूर वृद्धाश्रमात आजी-आजोबांना मिष्टान्न भोजन  

राहुरी ः नगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मुळा धरणात अखेर पाण्याची आवक सुरू झाली आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने आज सकाळी धरणात 2 हजार क्युसेकने कोतुळ येथील मुळा नदीतून आवक सुरू होती. मुळा धरण साठा 6 हजार दशलक्ष घनफूट इतका असून धरणाकडे पाण्याची आवक सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मुळा धरणामध्ये गेल्या 5- 6 वर्षांत जुलैच्या पहिल्याच आठवड्यात नव्याने पाणी दाखल झालेले आहे. तुलनेने धरण जुलै महिन्यातच निम्मे भरलेले असल्याने यंदाच्या वर्षीही धरण जुलैमध्ये भरणार काय ? याची चर्चा मुळा लाभक्षेत्रात सुरू झाली आहे. नगर जिल्ह्याला जलसंजीवनी ठरलेल्या मुळा धरणात च्या पाण्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. मागील वर्षी जॉय चक्रीवादळाने पावसाचे गणित महिनाभर उशिरा बदलले . असे असले तरी घाट माथ्यावर व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची दमदार हजेरी यावेळी दिसून आली. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अंबित, पिंपळगाव खांड ही धरणे तुडुंब भरली आणि मुळा धरणाकडे पाण्याची पहिली आवक 3 जुलै 2023 ला सुरू झाली. गेल्या 6-7 वर्षात 4 जुलै 2018, 8 जुलै 2019, 8 जुलै 2020, 9 जुलै 2022 ला नव्याने पाणी दाखल झालेले आहे. मागील वर्षी 3 जुलै 2023 ला नव्याने पाणी दाखल झाले आहे . गत तीन वर्षे धरण जुलै महिन्यातच निम्मे भरलेले आहे. गेल्या 10-11 वर्षात जुलैमध्ये सहा वेळा तर ऑगस्ट महिन्यात पाच वेळा धरण निम्मे भरलेले आहे. पावसाची परिस्थिती पाहता या महिन्यात धरण निम्मे भरणार काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS