Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये नव्या टप्पूची एंट्री होणार

मुंबई प्रतिनिधी - तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत आता राज अनादकटची जागा नवा टप्पू घेणार असून ही चॅलेंजिंग भूमिका आता नीतीश भूलानी साकारणार

५ वर्षांखालील मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागण्याची शक्यता ७ पट अधिक-डॉ. अभिराज पवार
अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला
आरेमधील मेट्रो कारशेडवरील स्थगिती उठवली ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय

मुंबई प्रतिनिधी – तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेत आता राज अनादकटची जागा नवा टप्पू घेणार असून ही चॅलेंजिंग भूमिका आता नीतीश भूलानी साकारणार आहे. राज अनादकटने तारक मेहता का उल्टा चष्मा सोडल्यानंतर निर्माता लगेचच नव्या टप्पूच्या शोधात जुंपले होते. अनेकांच्या ऑडिशन्स झाल्या आणि अखेर नव्या टप्पूचा शोध नीतीश भूलानीपाशी येऊन थांबला. आता यापुढे एपिसोडमध्ये नीतीश भूलानी टप्पूची नटखट भूमिका करताना दिसणार आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा ही विनोदी मालिका गेल्या १५ वर्षापासून प्रेक्षकांचे सातत्याने मनोरंजन करत आली आहे. या मालिकेत कोणीही एक हिरो किंवा हिरॉइन नाही. त्यामुळे यात सामान्य वाटणारे एखादे पात्रही नायकासारखे वावरताना दिसते. यातील प्रत्येक व्यक्तीरेखा महत्त्वाच्या आहेत आणि सर्वच लोकप्रियही आहेत. कोणतीही मालिका वर्षानुवर्षे चालत असेल तर कलाकारांची रिप्लेसमेंट हा विषय नक्कीच येतो. त्याप्रमाणे या मालिकेतील अनेक पात्रे ही बदलण्यात आली आहेत.आतापर्यंत तारक मेहतामधील टप्पूची आई म्हणजेच दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, सोढीची भूमिका साकारणारा कलाकार, शैलेश लोढा, नेहा मेहता यांच्यासह अनेक कलाकारांनी मालिका सोडली आहे. या कलाकारांच्या जागी नवीन कलाकारांना अभिनय करण्याची संधी देत निर्मात्यांनी ही मालिका इथंवर आणली आहे. या शोमधील टप्पू ही व्यक्तीरेखा साकारणारा राज अनादकट यांने अलिकडे ही मालिका सोडली होती.

COMMENTS