कर्जत : ज्या भागात जन्म घेतला तेथेच रुग्णसेवा देण्याचे ध्येय ठेवून डॉ. सुद्रिक यांनी काम सुरु केले. पुणे, नगर येथे ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या
कर्जत : ज्या भागात जन्म घेतला तेथेच रुग्णसेवा देण्याचे ध्येय ठेवून डॉ. सुद्रिक यांनी काम सुरु केले. पुणे, नगर येथे ज्या सुविधा उपलब्ध आहेत, त्या सुविधा कुळधरण येथे देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांसाठी न्यू लाईफ हॉस्पिटल हे संजीवनी ठरणार आहे. या हॉस्पिटलचा अधिकाधिक लौकिक होण्यासाठी माझ्या कायम शुभेच्छा आहेत, असे प्रतिपादन भाजपचे आ. प्रा. राम शिंदे यांनी केले.
डॉ. सुधीर सुद्रिक, डॉ. शिल्पा सुद्रिक संचलित कुळधरण येथील भव्य अशा न्यू लाईफ हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. डॉ. डी. एस. लोणकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविकात डॉ. सुधीर सुद्रिक म्हणाले, रुग्णांच्या विश्वासावर कुळधरणसारख्या ग्रामीण भागात अत्याधुनिक सुविधांचे हॉस्पिटल सुरु केल्याचा आनंद वाटत आहे. यापुढील काळात 50 बेड, 5 बेडचे आयसीयू व विविध सुविधांसह रुग्णसेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. या कार्यक्रमासाठी बापूसाहेब गुंड, मंगेश जगताप, महेंद्र गुंड, शरद जरे, डॉ. मधुकर कोपनर, डॉ. सुदर्शन जाधव, दिलीप पवार, अभय पाटील, सतिश सुद्रिक, डॉ. अर्चना औटी, डॉ. सुधीर बोरकर, सुधीर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. डी. एस. लोणकर, बाबासाहेब भोस, डॉ. शांतीलाल कोपनर, डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. राजेश तोरडमल, डॉ. बजरंग काळे, पप्पू शेख, समीर जगताप, श्री. कापसे यांनी आपल्या भाषणातून डॉ. सुद्रिक यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राहुल सुद्रिक संचलित श्री साई मेडिकल तसेच स्वाती अस्वर- कापरे यांच्या श्री साई लॅबोरेटरीजचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. शिल्पा सुद्रिक यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
COMMENTS