Homeताज्या बातम्यामनोरंजन

नीरजा फेम अभिनेत्री ईशा चोप्राचा विनयभंग

मुंबई - 'नीरजा' आणि 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री ईशा चोप्रा हिचा नुकताच एका ७० वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला. त्यामुळे ईशा

चक्क आई-वडिलांनीच केला दोन अल्पवयीन मुलींचा त्याग DAINIK LOKMNTHAN
राज्यस्तरीय रोप स्किपिंगमध्ये ‘ध्रुव’ची ४६ सुवर्णपदकांची कमाई
पुण्यामधील डॉक्टरची एक कोटीची फसवणूक

मुंबई – ‘नीरजा’ आणि ‘मेड इन हेवन’ या वेब सीरिजमध्ये दिसलेली अभिनेत्री ईशा चोप्रा हिचा नुकताच एका ७० वर्षीय व्यक्तीने विनयभंग केला. त्यामुळे ईशा चोप्रा खूप घाबरली आणि १० दिवस झोपू शकली नाही. ईशा चोप्राने आता सोशल मीडियावर एका दीर्घ पोस्टमध्ये आपला हृदयद्रावक अनुभव शेअर केला आहे. या घटनेमुळे ती गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियापासून दूर असल्याचेही ती म्हणाली. ईशा चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर १० पानांची पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तिने तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनेची सर्व माहिती दिली. तो ७० वर्षांचा माणूस कसा होता आणि त्याने अभिनेत्रीला स्वतःकडे कसे खेचले केले आणि त्याने कशापद्धतीने चुकीचा स्पर्श करत तिची छेड काढण्याचा प्रयन्त्न ईशा चोप्रा म्हणाली- तो ७० वर्षांचा होता, तो माझ्याकडे आला आणि… ईशा चोप्राने लिहिले की, ‘जवळपास १० दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी माझा विनयभंग केला. त्याने मला पकडले. त्याने चांगले कपडे घातले होता. तो सुशिक्षित दिसत होता आणि त्याचे वय सुमारे ७० वर्षे असावे. तो माझ्याकडे आला आणि त्याने स्वतःची ओळख करून दिली. मी त्याच्याशी हस्तांदोलन केले याचा त्याने चुकीचा अर्थ करुन घेतला. त्याला वाटले मी त्याच्याकडे आकर्षित झाले आहे. त्याने संधीचा फायदा घेत त्याच्या मनाला वाटेल तिथे चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागला. यामुळे मी बरेच दिवस शॉकमध्ये होतेईशा चोप्रा एकदम स्तब्ध झालेली… ईशाने सांगितले की सर्व काही इतक्या लवकर घडले की ती पूर्णपणे स्तब्ध झाली… एकदम निशब्द, तिला काय करावे ते समजत नव्हते. ईशा चोप्राच्या म्हणण्यानुसार, तिच्यासाठी सर्व काही थांबले आहे असेच तिला वाटत राहिले आणि तो माणूस तेथून अगदी आरामात निघून गेला.ईशा चोप्राने पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ती ७ वर्षांची असताना तिने पहिल्यांदाच अशा अत्याचाराचा सामना केला होता. तिला त्या माणसाचा चेहरा अजूनही आठवतो.

COMMENTS