Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज – पिपाडा

गणेशनगर प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावर असंख्य मावळे आपला जीव तळहातावर घेवुन आपल्या प्राणाची आहुती देवुन हिंदवी स्वराज्य निर्

जय- पराजयापेक्षा स्पर्धेत भाग घेणे महत्वाचे ः स्नेहलता कोल्हे
पद्मश्री पोपटराव पवार यांची राहीबाई पोपेरे यांनी बीज बँकेस दिली भेट
उद्यापासून रेमडेसिवीरचा पुरवठा होणार | पहा ‘सुपरफास्ट महाराष्ट्र’ | Lok News24

गणेशनगर प्रतिनिधी ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दावर असंख्य मावळे आपला जीव तळहातावर घेवुन आपल्या प्राणाची आहुती देवुन हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्याचा आपण सर्वजण उपभोग घेत आहोत, त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांनी व्यक्त केले. मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता पिपाडा यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा, शिवसेनेचे नाना बावके, आरपीआयचे दिलीपराव वाघमारे, नेमीचंद लोढा, पुंडलिक बावके, अनिल पिपाडा, आबा मेचे, मयूर कुंभकर्ण, गोवर्धन गाडेकर, महावीर पिपाडा, मदनलाल पिपाडा, नरेंद्र पिपाडा, अभिजित पिपाडा,विशाल मखाना आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्र पिपाडा व नाना बावके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या.उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन केले.

COMMENTS