Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण काळाची गरज

लातूर प्रतिनिधी - अमर्याद कृषी रसायनाच्या वापरामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्याउप्रमाणावर वाढलेला आहे, यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. नि

800 कर्जदार शेतक-यांची माहितीच जुळेना
टोप्यांच्या घरात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ
 फडणवीस महिलांवर फिदा झाले आहेत

लातूर प्रतिनिधी – अमर्याद कृषी रसायनाच्या वापरामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्याउप्रमाणावर वाढलेला आहे, यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे. निसर्गातील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतक-यांनी आता शेंद्रीय शेतीच्या माध्यमाने शाश्वत आणि काटेकोर शेती पद्धतीकडे वळणे आवश्यक आहे. परंतु शेतक-यांनी रासायनिक शेतीकडून एकदम शेंद्रीय शेतीकडे न वळता टप्प्या टप्प्याने एकात्मिक पद्धतीकडे संक्रमण करणेच संयुक्तिक राहील, असे मत एडीएमच्या शाश्वत शेती प्रकल्पाचे प्रमुख टी. पी. शेणॉय यांनी व्यक्त केले. वनामकृवि, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालय, लातूर करिता अमेरिका स्थित एडीएम केयर या संस्थेच्या माध्यमाने सुमारे 20 लक्ष रुपययांचा निधी शेतक-यांचे रासायनिक शेतीकडून एकात्मिक पद्धतीकडे टप्प्या टप्प्याने संक्रमण या तीन वर्षीय प्रकल्पासाठी प्राप्त झाला आहे.
या प्रकल्पाच्या पुनरावलोकन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालाचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, डॉ. बाबासाहेब ठोंबरे तर एडीएमच्या शाश्वत शेती प्रकल्पाचे प्रमुख टी. पी. शेणॉय, ख्यातनाम इतिहास तज्ज्ञ माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, विनोद चव्हाण, एडीएम अग्रो इंडस्ट्रीज आणि वायझाक प्रा. लि. लातूरचे अमोल ढवन आणि प्रकल्प समन्वयक तथा सहयोगी प्राध्यापक (कीटकशास्त्र) डॉ. विजय भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ख्यातनाम इतिहास तज्ञ तथा माजी प्राचार्य डॉ सोमनाथ रोडे, डॉ. ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील 20 पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रत्येकी 15 हजार याप्रमाणे एकूण 3 लक्ष रुपयाचे विद्यावेतनाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. भामरे यांनी या प्रकल्पाच्या कामाचे पुनरावलोकन व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. सूत्रसंचालन डॉ. दयानंद मोरे तर व आभार प्रदर्शन डॉ. विलास टाकणखार यांनी केले.

COMMENTS