Homeताज्या बातम्या

पाटण तालुक्यातील शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामांना आवश्यक निधी उपलब्ध करणार : ना. शंभूराज देसाई

विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करुन नयेतालुक्यातील विकास कामांबाबत बोलत असताना काही लोक म्हणतात विकास काम आम्ही करतो. अतिवृष्टीच्या निधीमध्

शेतकर्‍यांना 25%  टक्के अग्रीम पिक विमा रक्कम तात्काळ देण्यात यावी-अनिल जगताप
आमदार रोहित पवारांना ईडीचे समन्स
संगमनेरला तात्काळ दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करा

विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करुन नये
तालुक्यातील विकास कामांबाबत बोलत असताना काही लोक म्हणतात विकास काम आम्ही करतो. अतिवृष्टीच्या निधीमध्ये श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यांनी नेमका निधी कुठून कसा आणला ते तपासावे. निधी कसा आणला जातो त्याची मंजूरी कशी घेतात हे पहिलं बघा उगाचं फुकटाच श्रेय घेऊ नका, काही लोकांना आमचा विकास दिसत नाही. या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन सर्वसामान्य जनतेसाठी आपण काम करत आहोत. नको त्या गोष्टीसाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा विकास कामे केलेली केव्हाही चांगली, असा टोला ना. शंभूराजे देसाई यांनी लगावला.

दौलतनगर / वार्ताहर : माहे जुलै महिन्यात पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सार्वजनिक मालमत्तेसह शेतकर्‍यांच्या शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले होते. अनेक शेत जमिनींचे क्षेत्र पूर्णपणे खरवडून गेले होते. काही ठिकाणी मोठेमोठे दगड गोठे आले होते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांचा शेती अभावी उदर-निर्वाहाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाल्याने नुकसान झालेल्या शेत जमीनींची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे होते. पाटण तालुक्यातील शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामाचा शुभारंभ आज धावडे येथे झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेत जमिनींच्या दुरुस्तीचे कामांना आवश्यक असणारा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.
पाटण तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतजमिनीचे सुधारणा करणे अंतर्गत जेसीबीने दगड, माती, गाळ इ काढणे व जमिनीचे सपाटीकरण करणे या कामांचा शुभारंभ धावडे येथे झाला. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, प्रांताधिकारी सुनिल गाढे, तहसिलदार रमेश पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, बशीर खोंदू, गणेश भिसे, दत्ता अवघडे यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.
ना. देसाई म्हणाले, अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यात जिवीत, वित्तहानीसह शेतजमिनीचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेत जमिनींचे दुरुस्तीचे कामाकरीता निधी मंजूर होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरवठा करुन तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध करुन घेतला. जुलै महिन्यामध्ये पाटण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे, भूस्खलन व पूरस्थितीत नुकसान झाले. अतिवृष्टीमध्ये पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचे रस्ते, पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला होता. पुराचे पाणी शेतामध्ये जाऊन शेतजमीनी पुर्णपणे उखडून गेल्या आहेत. काही ठिकाणी जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणांत दगड गोटे आल्याने तालुक्यातील शेत जमिनींचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झाले. कृषी व महसूल विभागाने चांगले काम करुन शेत जमिनींची कामे चांगल्या पध्दतीने करावीत. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जमिनीची दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. अतिवृष्टीमुळे पाटण तालुक्यातील 119 गावातील 275 हेक्टर शेत जमिनींचे नुकसान झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रांताधिकारी सुनिल गाढे यांनी केले. आभार बशीर खोंदू यांनी मानले. यावेळी मंडल अधिकारी सोनवणे, डी. एन. निकाळजे, जे. जे. शिंदे, महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग, पंचायत समितीचे कर्मचारी व अधिकारी वर्ग तसेच मोरणा भागातील कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS