Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समताचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना एन.डी.आर.एफचे मार्गदर्शन

कोपरगाव प्रतिनिधी : देशात बर्‍याच ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने पुर येतो. तसेच काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती सुद्धा येत असते.अशा वेळेस सामान्य माणसाचे

शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याची गरज – अक्षय वाकचौरे
धक्कादायक, अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यु | LOKNews24
धार्मिक स्थळांच्या सुरक्षेची काळजी घ्या : पोलिस निरीक्षक गायकवाड

कोपरगाव प्रतिनिधी : देशात बर्‍याच ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने पुर येतो. तसेच काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती सुद्धा येत असते.अशा वेळेस सामान्य माणसाचे जीवन हे विस्कळीत होते. मग अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांना सुरक्षित जागी पोहोचविणे, त्यांना अन्नपुरवठा करणे यासाठी शासनाने एक पथक तयार केले आहे. त्या पथकाला राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एन.डी.आर.एफ) असे म्हटले जाते. या पथकाचे जवान आपल्या जिवाची परवा न करता सामान्य जनतेला आपत्तीमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी तत्पर असतात. या पथकात डॉक्टर, इंजिनिअर, श्‍वान अशा विशेष लोकांचा आणि पाळीव प्राण्यांचा समावेश असतो.अशी माहिती एन.डी.आर.एफ.पुणे येथील वरिष्ठ अधिकारी  रोहित राठोड यांनी दिली.
अधिक माहिती देताना एन.डी.आर.एफचे जवान विकास राऊत म्हणाले की, अनेक युवकांचे स्वप्न हे राष्ट्र सेवा करण्याचे असते. या दलाच्या माध्यमातून देशाची राष्ट्र सेवा करता येते. त्यासाठी एच.एस.सी.परीक्षा उत्तीर्ण होऊन बीएसएफ, एसएसबी, सीआयएसएफ, सीआरपीएफ , आयटीबीपी यापैकी एका दलात भरती होणे गरजेचे असते. या दलांमध्ये राहून 3-4 वर्ष सेवा द्यावी लागते. या दलात ठराविक काळात सेवा दिल्यानंतर या दलात सेवेसाठी पात्र ठरत असतो.या दलात येण्यासाठी आपण पात्र झाल्यानंतर आपल्याला प्रशिक्षण दिले जाते. नंतर एनडीआरएफ पथकात समावेश होतो. समता इंटरनॅशनल स्कूलचे विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शालेय पोषण आहार विभाग, वाहतूक विभाग आदींसह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांना अहमदनगर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि पुणे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या अधिकार्‍यांनी नैसर्गिक व मनुष्यनिर्मित आपत्ती विषयक माहिती  देत कशा प्रकारे आपली पूर्वतयारी असली पाहिजे तसेच पूर, भूकंप, रस्ते अपघात, चक्रीवादळ  यासारख्या आपत्तीच्या काळात कोणते उपाय, योजना तयार कराव्यात या बाबत मार्गदर्शन केले. तसेच आज सगळीकडे हृदयविकाराने अनेक जणांचे मृत्यू होत आहेत. एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्या रुग्णाला सीपीआर कसा द्यायचा? त्याचबरोबर लहान मुलांना सीपीआर कसा द्यावा लागतो? या बाबत मार्गदर्शन करून प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविली. सामान्य लोकांनी शारीरिक आणि मानसिक संतुलन कसे राखावे? आणि प्रसंगावधान साधून त्या आपत्ती पासून स्वतःचा बचाव कसा करावा? तसेच आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे? या बाबत ही अनमोल, सखोल मार्गदर्शन केले. प्रसंगी वरिष्ठ अधिकार्‍यांसह एन.डी.आर.एफचे 22जवान उपस्थित होते. समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या हर्षलता शर्मा यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पुणे विभाग एन.डी.आर.एफ.चे वरिष्ठ अधिकारी रोहित राठोड, जालिंदर फुंडे यांचा सत्कार करण्यात आला. या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार उपप्राचार्य समीर आत्तार यांनी मानले.

COMMENTS