‘राष्ट्रवादी’चा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न  : नाना पटोले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘राष्ट्रवादी’चा काँग्रेस संपवण्याचा प्रयत्न : नाना पटोले

नागपूर : राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सत्तेवर असली, तरी तिन्ही पक्षात सातत्याने कुरबुरी सुरु असल्याचे समोर येते. सोमवारी काँगे्रसचे

प्रचाराच्या रणधुमाळीचा आज शेवटचा दिवस
महाराष्ट्रावर एखादा थुंकत असेल तर आम्ही त्याची आरती करणार नाही | LOKNews24
विद्यार्थ्यांना होणार मोफत शालेय साहित्य वाटप

नागपूर : राज्यात गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सत्तेवर असली, तरी तिन्ही पक्षात सातत्याने कुरबुरी सुरु असल्याचे समोर येते. सोमवारी काँगे्रसचे नेते नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँगे्रसवर गंभीर आरोप राष्ट्रवादी काँगे्रस सातत्याने काँगे्रसला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे.
काँगे्रसला पुन्हा जनाधार मिळवून देण्यासाठी 2 अ‍ॅाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती ही पटोले यांनी दिली. गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला. हे काम सातत्याने सुरू आहे. याची तक्रार मी चिंतन शिबिरात हायकमांडकडे केली आहे. अशी माहिती पटोले यांनी दिली. चिंतन शिबिरात गेल्या अडीच वर्षातील राष्ट्रवादीच्या कुरघोडीचे अनेक उदाहरणे आम्ही आमच्या हायकमांड समोर मांडली. त्यांनी हे सर्व ऐकून घेतले या संदर्भात आता पुढची रणनीती ठरवली जाईल अशी माहिती पटोले यांनी दिली. देशाची स्थिती श्रीलंकेसारखी झालीय. भाजपने धर्म आणि जातीचे राजकारण केले. उदयपूरच्या शिबीरात देश हिताचे चिंतन झाले असे म्हणत 2 अ‍ॅाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी यावेळी दिली. तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ऐकला चलो रे वर काँग्रेस ठाम असल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे. संघटना मजबूत करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीतीची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी काँग्रेसने नवसंकल्प शिबिराचं आयोजन केलं होतं. मात्र, शिबिरात नेतृत्वाचा मुद्दा गाजला. यादरम्यान अनेक नेत्यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांनाही अध्यक्ष करण्याची मागणी केली. राजकीय घडामोडी समितीत झालेल्या चर्चेदरम्यान पक्षाचे नेते आणि धार्मिक नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी प्रियांका गांधी यांना अध्यक्ष बनवण्याची जोरदार मागणी केली. प्रमोद कृष्णम यांनी ही मागणी केली, तेव्हा या बैठकीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या.

पटेल-पटोले संघर्षामुळे आघाडीत दरी
भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या अध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा लिखीत करार मोडून राष्ट्रवादीने भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली, ही दगाबाजीच आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला होता. तसेच याला पाठीत खंजीर खुपसणे नाही तर दुसरे काय म्हणायचे? असा सवालही नाना पटोले यांनी केला होता. नाना पटोले म्हणाले, भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरवले होते. 30 जानेवारी 2022 रोजी या बाबतचे पत्र तिन्ही पक्षांनी काढले होते. त्यावर माझ्यासह, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेनेकडून सुभाष देसाई यांनी स्वाक्षर्‍या केल्या होत्या. तरी देखील राष्ट्रवादीने भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केल्याचा दावा पटोले यांनी केला आहे.

COMMENTS