Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या अश्‍विनी पवार बिनविरोध

लोणंद / वार्ताहर : खंडाळा पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्‍विनी विपुल पवार यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्ण

शिरवडेत कृष्णा पात्रात शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
कोल्हापूर-भुईबावडा घाटात ट्रक पलटी, मार्गावरील वाहतूक ठप्प
पाडेगावच्या नववधूचे आधी लगीन परीक्षेसोबत; परिक्षेनंतर निरेत संपन्न झाला विवाह सोहळा

लोणंद / वार्ताहर : खंडाळा पंचायत समितीच्या सभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्‍विनी विपुल पवार यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी ही निवड जाहीर केली.
पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडीसाठी काल सकाळी साडेअकरा वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलावली होती. बैठकीस माजी सभापती राजेंद्र तांबे व मकरंद मोटे, उपसभापती वंदनाताई धायगुडे-पाटील, सदस्या अश्‍विनी पवार, शोभा जाधव व चंद्रकांत यादव उपस्थित होते. सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या अश्‍विनी पवार तर भाजपचे चंद्रकांत यादव यांनी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या वेळेत यादव यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने सभापतीपदी अश्‍विनी पवार यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जाधव यांनी घोषित केले. या कामी गटविकास अधिकारी माणिकराव बिचुकले यांनी सहकार्य केले.

COMMENTS