Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार कर्नाटक निवडणूक

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यातील निवडणुकीसाठी मतदान एकाच दिवशी होणार आहे. दहा मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी

गोरक्षनाथ गडावर ७ जूनला जलउत्सव व दररोजच्या महाप्रसादाचा प्रारंभ
राज्यात उष्णतेची लाट कायम
‘करिश्मा का करिश्मा’ फेम अभिनेत्री झनक शुक्लानं केला साखरपुडा

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. राज्यातील निवडणुकीसाठी मतदान एकाच दिवशी होणार आहे. दहा मे रोजी मतदान तर 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 20 एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मात्र आता राष्ट्रवादीने देखील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आज राष्ट्रवादीची बैठक कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर आज राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ही बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक लढण्याबाबत आज राष्ट्रवादी निर्णय घेणार आहे. पक्षाकडून 50 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करण्यात येण्याची शक्यता आहे. आजा राष्ट्रवादी कर्नाटक विधनसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करणार आहे

COMMENTS