Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस लढणार दिल्ली विधानसभा : अजित पवार

नवी दिल्ली :राजधानी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपल्या असतांनाच राष्ट्रवादी कॉगे्रस पक्षाने दिल्ली विधानसभा लढण्याच

मोहोळजवळ अपघातात चार महिला भाविकांचा मृत्यू; सहा जण जखमी
निळवंडे धरणाच्या पंचम सुधारीत प्रशासकीय मंजुरी
‘शासन आपल्या दारी’ अन् जनता ‘एसटी विना त्रासलेली’

नवी दिल्ली :राजधानी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यावर येवून ठेपल्या असतांनाच राष्ट्रवादी कॉगे्रस पक्षाने दिल्ली विधानसभा लढण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात गुरूवारी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित पवारांसोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढण्याचेही संकेत दिले.
महायुतीच्या बैठकीपूर्वी अजित पवारांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्याला फारसे यश आले नाही. मात्र त्यात खचून न जाता आम्ही जोमाने विधानसभा निवडणुकीसाठी काम केले. आपले काही उमेदवार 1 लाखांच्यावर मते मिळवत विजय मिळवला आहे. ईव्हीएम मशीनवर काही लोक दोष देत आहेत, मात्र त्यात काही तथ्य नाही. यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्टीकरण दिले आहे.

COMMENTS